पुणे

‘एएफकॅट’चे प्रवेशपत्र शुक्रवारपासून उपलब्ध

CD

पुणे, ता. ९ ः भारतीय हवाईदलातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट’च्या (एएफकॅट) प्रक्रियेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना शुक्रवारपासून (ता. १०) उपलब्ध होणार आहेत. हे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर सकाळी अकरानंतर उपलब्ध होईल.

हवाईदलातर्फे वर्षातून दोन वेळा एएफकॅट ही प्रवेश प्रक्रिया आयोजित केली जाते. ही प्रक्रिया महिला व पुरुष उमेदवारांसाठी असून याची लेखी परीक्षा येत्या २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान देशातील विविध केंद्रांमध्‍ये पार पडणार आहे. प्रवेशपत्र उमेदवारांना परीक्षेच्या तारखेपर्यंत डाऊनलोड करता येईल. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून यासाठी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्राची एक प्रत, एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि त्याचबरोबर एक ओळखपत्र (अर्ज भरताना वापरलेलेच कागदपत्रे व फोटो) सोबत बाळगणे आवश्‍यक आहे. यासाठी हवाईदलाच्या afcat.cdac.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर उमेदवारांना करात येईल.

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी
- हवाईदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगइन करा
- ‘करिअर’ या विकल्पावर जाऊन प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा
- एएफकॅट लॉगिन युझरनेम, पासवर्ड व सुरक्षा कोड भरा
- त्यानंतर प्रवेशपत्र डाऊनलोड करा

चुकीचा तपशील असल्यास चौकशी करावी
जर उमेदवाराच्‍या प्रवेशपत्रात तपशील चुकीचा असेल, प्रवेशपत्र डाउनलोड होत नसेल किंवा उमेदवाराला प्रवेशपत्र त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीद्वारे प्राप्त झाले नाही तर त्‍यांनी पुण्याच्या सी-डॅक येथील एएफकॅट क्वेरी सेलकडून त्वरित चौकशी करावी.

7.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT