पुणे

सुधारित प्रारूप मतदारयादी २७ फेब्रुवारीला

CD

पुणे, ता. १० : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी सुधारित प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार २७ फेब्रुवारीला सुधारित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.
प्राधिकरणाने राज्यातील निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रकिया सुरू केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी २४५ बाजार समित्यांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. तथापि, सात फेब्रुवारीच्या अधिसूचनेनुसार नव्याने निवडून आलेल्या प्राथमिक सहकारी पतसंस्था, बहुद्देशीय सहकारी संस्था आणि ग्रामपंचायत सदस्यांना अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे आवश्यक होते. त्यामुळे नवीन सदस्यांना समाविष्ट करून सुधारित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
एक सप्टेंबर २०२२ या अर्हता दिनांकानंतर राज्यातील नऊ हजार ५२५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. उच्च न्यायालयाने नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत सहभागी होता यावे, यासाठी ३० एप्रिल अथवा त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत प्राधिकरणास आदेश दिले आहेत. पूर्वीच्या अंतिम यादीत समावेश असलेले परंतु या कालावधीत निवडणूक न लढवलेले आणि पराभूत झालेले सदस्य अपात्र झाले आहेत.


प्रारूप मतदार यादीमध्ये २७ फेब्रुवारी ते आठ मार्च २०२३ या कालावधीत हरकती घेता येतील. प्राप्त झालेल्या हरकतींवर १७ मार्चपर्यंत निर्णय घेऊन येत्या २० मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या अंतिम मतदार यादीमध्येही नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश नसल्यास त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज करता येईल.
- डॉ. जगदीश पाटील, आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT