पुणे

पुण्यात उन्हाचा चटका वाढला

CD

पुणे, ता. १३ ः पुणे शहरात उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानाचा पारा पस्तिशीपर्यंत पोचला आहे. तर किमान तापमान १० अंशांच्या जवळ असल्याने कमाल आणि किमान तापमानातील तफावत कायम आहे. सोमवारी लवळे येथे उच्चांकी ३५.४ अंश तर शिवाजीनगर येथे नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी (ता. १४) कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.
पहाटेच्यावेळी थंडी तर दुपारनंतर उन्हाच्या कडाक्याचा अनुभव पुणेकर सध्या घेत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहराला उन्हाळ्याची चाहूल लागली असून, कमाल तापमानात वाढ होत आहे. असे असले तरी किमान तापमान मात्र अजूनही १० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. राज्यातही उत्तर महाराष्ट्रात, विदर्भासह मराठवाड्याच्या तापमानात घट झाली आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र किमान तापमानात मोठी घट पाहायला मिळाली. निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढता असून, अनेक ठिकाणी तापमान पस्तिशी पार असल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत.

शहरातील सरासरी तापमान (अंश सेल्सिअस)
ठिकाण ः किमान ः कमाल
शिवाजीनगर ः १०.६ ः ३२.३
पाषाण ः १२.८ ः ३१.८
चिंचवड ः १८.५ ः ३४.१
लवळे ः १९.४ ः ३५.४
मगरपट्टा ः १८.४ ः ३३.१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT