पुणे

गोवरमुळे दीड महिन्यांत तीन मृत्यू

CD

पुणे, ता. १६ : राज्यात गेल्या दीड महिन्यांमध्ये गोवरमुळे तीन लहान मुलांचा मृत्यू झाला असून, त्यात पुण्यासह मुंबई आणि वसई-विरार येथील रुग्णांचा समावेश आहे.
राज्यात गेल्या वर्षीच्या अखेरपासून गोवरचा उद्रेक सुरू झाला. गेल्या वर्षभरात २१५ ठिकाणी गोवरच्या साथीचा उद्रेक झाल्याची नोंद सार्वजनिक आरोग्य खात्यात झाली. त्यात २६ रुग्णांचा मृत्यू झाला. ही साथ नियंत्रित करण्यासाठी खात्याने तातडीने पावले उचलत १७ हजार १२२ सर्वेक्षण पथके नियुक्त केली. आतापर्यंत ८० लाख १६ हजार ५४५ घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. तसेच, गोवर रुबेलाचा अतिरिक्त डोस बालकांना देण्यात आला. या उपाययोजनांमुळे नवीन वर्षांत गोवरच्या रुग्णांची संख्या नियंत्रित झाल्याचे दिसते. या वर्षी आतापर्यंत ११ ठिकाणी उद्रेक झाला. त्यात एक हजार ६५६ संशयित रुग्णांची नोंद झाली. तर, ३८५ बालकांना गोवरचे निश्चित निदान झाले. त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

वर्ष ......... उद्रेकांची संख्या ............ संशयित रुग्ण .... निश्चित निदान .... मृत्यू
२०१९ ...... ३ ............................... १३३७ ................ १५३ ................. ३
२०२० ...... २ ............................... २१५० ................. १९३ ................ ३
२०२१ ...... १ ............................... ३६६८ ................... ९२ ................ २
२०२२ ....... २१५ .......................... २२,३१७ ................ १७९८ ............ २६
२०२३ .......११ ............................. १६५६ .................... ३८५ .............. ३

गोवरमुळे झालेले मृत्यू .... २९
वयोगट
० ते ११ महिने ....... १०
१२ ते २४ महिने ...... १०
२५ ते ६० महिने ....... ६
६१ महिन्यापेक्षा जास्त ... ३

मुले .... १५
मुली .... १४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: धोकादायक डेव्हिड मिलर आऊट; सुरुवातीच्या धक्क्यांनंतर गुजरातचा सावरला डाव

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT