पुणे

कोरेगाव पार्कमध्ये सव्वा कोटीची वीजचोरी

CD

पुणे, ता. १९ : कोरेगाव पार्क येथील एका वाणिज्यिक वीज ग्राहकानं मीटरमध्ये फेरफार करून ३ लाख ३७ हजार २१५ युनिटची वीजचोरी केल्याचे महावितरणने केलेल्या तपासणीत उघड झाले. त्यांना एक कोटी २७ लाख ५० हजार रकमेचे बिल देण्यात आले आहे.
पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी वीज चोरीविरुद्ध मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राबविलेल्या वीज मीटर तपासणी मोहिमेत ही चोरी उघडकीस आली. वीज मिटरच्या सिलसोबत छेडछाड करून मिटरमध्ये प्रत्यक्ष विजवापराची कमी नोंद होण्यासाठी रेजिस्टंन्स बसविले असल्याचे तपासणीत दिसून आले. त्यामुळे मीटरमधील वीज वापर प्रत्यक्षातील वीज वापरापेक्षा ७९ टक्के कमी नोंदविला जात होता. या वीज ग्राहकास एक कोटी २७ लाख ५० हजार रकमेचे बिल दिले आहे. सहा लाख सहा रुपयांचे तडजोड शुल्क आकारून त्यांच्याकडून हे बिल आदा करण्यात आले.
प्रादेशिक संचालकांनी एका परिपत्रकाद्वारे २० किलोवॅट व त्यापेक्षा जास्त भार असलेल्या ग्राहकांच्या स्थळाचे निरीक्षण करून अहवाल सादर करण्यच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे वीज चोरीचा छडा लागत असून वीज चोरांवर कारवाई करण्यात येत आहे. पुणे शहर व जिल्ह्याबरोबरच सांगली, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातही वीज चोरीविरुद्ध महावितरणकडून मोहीम राबविण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव वाचवण्यासाठी आलेली SDRF ची बोट उलटली! नगरच्या प्रवरा नदीत तिघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरु

Pune Porsche Crash : बाल सुधारगृहात कसा असतो दिनक्रम? विशाल अग्रवालच्या आरोपी मुलाची १४ दिवस झाली रवानगी

Share Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; निफ्टी 22,600च्या वर, मिडकॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावर

Malaria Vaccine : मलेरियाच्या विरोधात लढण्यासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केली नवीन लस, जेएनयू विद्यापीठाचे संशोधन

Pune Porsche Accident : "पोलीस महानालायक असतात..."; पुण्यातील पोर्शे गाडी अपघाताबाबत केतकीनं शेअर केला व्हिडीओ

SCROLL FOR NEXT