पुणे

पैसेवाटपाविरोधी कसब्यात परस्परविरोधी तक्रारी

CD

पुणे, ता. २६ : भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैशाचे वाटप केल्याचा तसेच विशिष्ट समाजाच्या मतदारांना पैसे देऊन थेट बोटाला शाई लावून मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी केला. तर पैसेवाटपास विरोध केला, म्हणून महात्मा फुले पेठेतील एका कुटुंबाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. याचबरोबर भाजपनेही या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहेत.

या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात नीता किशन शिंदे (वय ४२, रा. गंज पेठ) यांच्या तक्रारीवरून विष्णू हरिहर, निर्मल हरिहर, हिरा हरिहर व इतर १५ ते १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर, हिरालाल नारायण हरिहर (वय ६७, रा. गंज पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल कांबळे, निहाल कांबळे, गोविंद लोंढे, आकाश भोसले, सनी नाईक व इतर १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महात्मा फुले पेठ (गंज पेठ) येथील लहुजी वस्ताद साळवे तालीम येथे पत्रकार परिषद घेत या संदर्भातील आरोप केला. या वेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे, माजी नगरसेवक अविनाश बागवे या वेळी उपस्थित होते.

अजामीनपात्र गुन्हा असूनही पोलिसांनी हरिहर यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. रविवारी ते विविध मतदान केंद्रांवर निर्धास्तपणे फिरत होते. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली पोलिस काम करत आहेत, असा आरोप जगताप यांनी केला. तसेच लोहियानगर परिसरातील विशिष्ट समाजाच्या मतदारांना पैसे देऊन त्यांच्या बोटाला मतदानानंतर लावण्यात येणारी शाई लावण्यात आली. निवडणूक आयोगाकडील शाई भाजपच्या कार्यकर्त्यांकडे कशी आली, असा सवालही जगताप यांनी केला. तर भारतीय जनता पक्षाने पैसे वाटप करून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप जोशी व काकडे यांनी केला.

‘आचारसंहिता भंगाबद्दल रासनेंवर कारवाई करावी’
मतदान करताना हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. ते स्वतः नूतन मराठी विद्यालय प्रशाला बूथ क्रमांक ७५ या मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले असताना त्यांनी त्यांचे चिन्ह असलेली कमळाची पट्टी गळ्यात घालून मतदान केले, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केला आहे. ही बाब गंभीर असून, त्यावर निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT