पुणे

‘शंकरराव चव्हाण हे प्रसिद्धीपासून अलिप्त राहणारे नेते’

CD

पुणे, ता. २७ ः कणखरपणाबरोबरच कनवाळूपणा जपणारे शंकरराव चव्हाण तळागाळातील लोकांसाठी झटणारे पण प्रसिद्धीपासून अलिप्त राहणारे नेते होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी नुकेतच केले.
मराठवाडा मित्रमंडळातर्फे शंकरराव चव्हाण यांच्या १९व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. क्रांती देशमुख आणि संस्थेचे कार्यकारिणी सदस्य तेज निवळीकर उपस्थित होते. ‘‘समाजकारणासाठी राजकारणाचा वैधानिक उपयोग कसा करून घेता येईल, याचा उत्तम नमुना शंकररावांनी आपल्यासमोर ठेवला आहे. सध्याच्या राजकारणाचा पोत बदलला आहे. त्यात समाजहितापेक्षा स्वलाभाला महत्त्व मिळत आहे’’, असे भालेराव यांनी सांगितले. ‘‘शंकररावांनी अभ्यासपूर्ण, समस्येवर उत्तर शोधणारे समाजहितैषी राजकारण केले’’, असे मत संगोराम यांनी व्यक्त केले. प्राचार्य जाधव यांनी शंकरराव चव्हाण यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT