पुणे

लूटमारीस विरोध करणाऱ्याचा खून

CD

पुणे, ता. १ : चोरट्यांना विरोध करणाऱ्या पादचारी तरुणाचा बांबूने बेदम मारहाण करीत खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव नागनाथ चेंडके (वय २३, रा. खोपडेनगर, कात्रज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रदीप हिरालाल शिंदे (वय १९, रा. काका वस्ती, कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. तर चौदा वर्षीय अल्पवयीन साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक अतुल थोरात यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंडके मजुरी करतो. तो धनकवडीतील चैतन्यनगर परिसरातून निघाला होता. रात्री साडेआठच्या सुमारास त्याला आरोपी शिंदे आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराने चेंडकेला अडवले. त्याला धमकावून पैसे मागितले. चेंडकेने नकार दिल्यानंतर दोघांनी त्याला बांबूने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या चेंडकेचा रुग्णालयात मृत्यू झाला. तपासात मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी प्रदीप शिंदे याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक वर्षा तावडे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंचे आदेश मनमानी करणारे अन् एकतर्फी, FDA कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका दाखल

Gold Rate Today: 2 दिवसांच्या तुफान वाढीनंतर सोनं घसरलं! महाराष्ट्रात आज 24, 22 आणि 18 कॅरेटचा भाव किती?

Latest Marathi Live Update: राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम

Buddha Vihar Fund Controversy : थिबाराजाकालीन बुद्धविहारासाठी मंजूर झालेल्या कोट्यवधींच्या निधीवरून पेटला वाद; थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

Koyna Dam Water Storage Latest Update : कोयना धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली! येत्या काही दिवसांत विसर्ग? महाबळेश्वरसह नवजात धुवांधार पाऊस, पाहा आजचा पाणीसाठा

SCROLL FOR NEXT