पुणे

महाविकास आघाडीचा विजयोत्सव : पोटनिवडणुकीत धंगेकर विजयी कसबा रंगला तीन रंगात

CD

पुणे, ता. २ : जवळपास तीन दशकांनंतर काँग्रेसचा झेंडा कसबा विधानसभा मतदारसंघात फडकला. त्याच्यासोबत राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा भगवाही दिमाखात फडकला. गुलाबी, भगवा आणि हिरवा अशा तीन रंगांची एकत्र उधळण कसब्यात करून जागोजागी महाविकास आघाडीचा विजयोत्सव साजरा झाला. रवींद्र धंगेकर यांचे कटआऊट घेऊन दुचाकीवरून फिरणाऱ्या उत्साही तरुणही कसब्यात लक्ष वेधून घेत होते.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवाराची समोरासमोर लढत होती. त्याची मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली. त्या क्षणापासून कसब्यात जागोजागी काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. मतमोजणीच्या एकेका फेरीमध्ये धंगेकर आघाडी घेत होते. त्या प्रत्येक फेरीनंतर चौकाचौकात येऊन काँग्रेसच्या जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेली. अखेरच्या काही फेऱ्या सुरू असताना रविवार पेठेतील धंगेकर यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात गुलालाची उधळण केली. त्यात महिलांचा सहभागही लक्षणीय होता. फुगड्या खेळून त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला.

तीन पक्षांचे झेंडे
महाविकास आघाडीमधील काँग्रेसचा पंजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचा भगवा झेंडा हातात घेतलेले कार्यकर्ते एकत्र येऊन विजयोत्सव साजरा करत होते. या तीनही पक्षांचे झेंडे हातात घेतलेल्या तरुणांनी ‘मी रवी धंगेकर’ छापलेल्या टोप्या घातल्या होत्या. धंगेकर यांचा कटआऊट घेऊन कसब्याच्या रस्त्यां-रस्त्यांवरून दुचाकीवरून ही तरुणाई फिरत असल्याचे चित्र दिवसभर दिसत होते. चौकाचौकात जमलेल्या कार्यकर्त्यांना भेटत, घोषणा देत ही तरुणाई विजयाचा जल्लोष करीत पुढे जात होती.

रंगांची उधळण
कसब्याच्या पूर्व भागातील गल्ल्या-गल्ल्यांमध्ये आणि गणपती मंडळांपुढे ध्वनिक्षेपक लावून विजयाच्या गुलालाची उधळण सकाळपासून सुरू होती. सदाशिव, नारायण आणि शनिवार पेठ या भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पेठांमधील चौकातही गुलालाची उधळण झाल्याचे चित्र दिसत होते. शनिपार, नागनाथपार, दत्तवाडी, नारायण पेठ येथे फटक्याची आतषबाजी करण्यात आली. रविवार, शुक्रवार, गुरुवार या पेठांमध्ये भगव्या गुलालाची जोरदार उधळण झाली. तर, मोमीनपुरा या मुस्लिमबहुल भागात हिरव्या रंगांची उधळण करीत काँग्रेसच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात होता.

पेढे, लाडूचे चौकाचौकात वाटप
धंगेकर यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर ध्वनिक्षेपक लावून पेढे आणि लाडूचे वाटप चौकाचौकात सुरू होते. मोतीचूर लाडू, मलई पेढे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना वाटून महाविकास आघाडीच्या विजयाचा आनंद कार्यकर्ते व्यक्त करीत होते.

धंगेकरांच्या कार्यालयासमोर दिवाळी
काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयासमोर अक्षरश: दिवाळी साजरी करण्यात आली. जोरदार आतषबाजी करून गुलालाची उधळण करत धंगेकरांच्या विजयोत्सवाचा आनंद व्यक्त करण्यात आला. त्यांच्या कार्यालयासमोर मांडव टाकला होता. त्यात त्यांचे कटआऊट केलेले चित्र लावले होते. तसेच काही कार्यकर्ते कटआऊट हातात घेऊन नाचून आपल्या नेत्याच्या विजयाचा जल्लोष साजरा करीत होते. शहराच्या वेगवेगळ्या भागांतून कार्यकर्ते धंगेकरांच्या कार्यालयात येत होते.

काँग्रेस भवनमध्ये जल्लोष
काँग्रेसच्या उमेदवाराचा कसब्यात विजय झाल्याने पक्षाचे प्रमुख कार्यालय असलेल्या काँग्रेस भवनमध्ये आनंदोत्सव साजरा केला गेला. पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी आमदार, नगरसेवक, प्रमुख नेते यांनी काँग्रेस भवन गजबजले होते. देशभक्तीपर गाणी लावून भारावून टाकणारे वातावरण निर्माण केले होते. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पक्ष पिछाडीवर असल्याने काँग्रेस भवनातील वातावरण मरगळलेल्या अवस्थेत होते. या विजयाने मरगळ झटकून टाकली गेल्याचे दिसले. प्रत्येक काँग्रेस नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT