पुणे

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

CD

पुणे, ता. ११ : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि एनपावर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचा विकास घडविणारा ‘स्वजीवी महाराष्ट्र’ उपक्रम राबविण्यात आला. पुण्यासह पालघर, ठाणे जिल्ह्यातील ४० आदर्श शाळांमध्ये हा उपक्रम झाला. पुढील शैक्षणिक वर्षात राज्यातील ४८८ आदर्श शाळांपर्यंत हा उपक्रम पोचविण्याची तयारी सुरू झाली आहे. एससीईआरटी आणि एनपावर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, त्यातून उपक्रमाची सुरवात झाली. या उपक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेची मानसिकता घडविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रत्येक शाळेतून निवडक उद्योजकीय कल्पना जिल्हा स्तरावर ‘स्वजीवी तेजांकित २०२३’ सोहळ्यात सादर केल्या गेल्या. तिन्ही जिल्ह्यांतून निवडून आलेल्या प्रत्येकी तीन सर्वोत्कृष्ट कल्पना राज्य स्तरावर ‘स्वजीवी तेजांकित २०२३’ महाअंतिम सोहळ्यात सादर करण्यात आल्या. या वेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, ‘एनपावर’चे संस्थापक सुशील मुणगेकर यांनी मार्गदर्शन केले. ‘पॉझीटू ग्रुप’चे सीए विनीत देव आणि ‘प्रगती लीडरशिप’चे विभास जोशी यांनी परीक्षक म्हणून सर्व उपक्रमांची पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT