पुणे

‘ब्रह्मध्वज महोत्सवाचे आधुनिक रुप म्हणजे गुढीपाडवा’

CD

पुणे, ता. २० : ‘‘गुढीपाडवा हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. इंद्रध्वज, ब्रह्मध्वज अशा ध्वजपूजांचा इतिहास फार प्राचीन आहे. वैदिक काळापासून ध्वज हा आपल्या समाजाचा मानबिंदू आहे. त्यापैकी ब्रह्मध्वज उभारून त्यासाठी केला जाणारा महोत्सव हाच आजच्या काळातील गुढीपाडवा आहे’’, असे प्रतिपादन वैदिक संस्कृतीचे अभ्यासक प्रणव गोखले यांनी केले. चौफेर प्रतिष्ठानतर्फे ‘गुढीपाडवा व पंचांगाचे महत्त्व’ या विषयावर आयोजित विशेष कार्यक्रम व व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, रा. स्व. संघ मोतीबाग नगर संघचालक शरद चंद्रचूड, चौफेर प्रतिष्ठान व श्री यशोधन नागरी सहकारी पतसंस्थेचे राहुल भाटे, निरंजन गोळे, ग्रंथ पारायण दिंडीचे वीरेंद्र कुंटे आदी उपस्थित होते. ‘आज आपला व संस्कृतीचा घटस्फोट झाल्याचे चित्र दिसत आहे. हे चित्र बदलण्यासाठी आपली व संस्कृतीची घटस्थापना करण्याचा प्रयत्न करुया’, असे आफळे यांनी सांगितले. प्राची डोळे यांनी सूत्रसंचालन केले. वृंदा जोशी यांनी आभार मानले.

श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव बुधवारपासून
पुणे, ता. २० : ‘श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणे’ यांच्यातर्फे बुधवारपासून (ता. २२) जंगली महाराज मंदिरात ‘सद्‍गुरु श्री जंगली महाराज १३३ वा पुण्यतिथी उत्सव’ आयोजित केला आहे. ५ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात धार्मिक कार्यक्रम, भजन, व्याख्याने आणि संगीत सभा होणार आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सचिव शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. उत्सवांतर्गत दररोज सायंकाळी ६ वाजता विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. तसेच, दररोज रात्री ८ वाजता संगीत सभेंतर्गत प्रसिद्ध गायक कलाकारांचे भक्तिगीते आणि संगीताचे कार्यक्रम होणार आहेत. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जंगली महाराज यांचा पालखी सोहळा होणार असून ६ एप्रिल रोजी दुपारी १ नंतर महाप्रसादाचे वाटप होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठ्या मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT