पुणे

एक टक्का अधिभारापोटी पालिकेला मिळणार १०६ कोटी

CD

पुणे, ता. २० : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारामुळे जमा होणारी रक्कम महापालिकांना देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे २०१५-१६ ते २०२१-२२ पर्यंत थकीत असलेली ३९५ कोटी रुपयांची रक्कम राज्यातील २४ महापालिकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेला १०५ कोटी, तर पिंपरी चिंचवड महापालिकेला ३२ कोटी ९७ रुपयांचा निधी विकास कामांसाठी उपलब्ध होणार आहे.

महापालिका हद्दीतील सदनिका, दुकान अथवा जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर एक टक्का या दराने अधिभार शुल्क आकारले जाते. ही रक्कम नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत शासनाकडे जमा होते. शासनाकडे जमा झालेली ही रक्कम पालिकेला विविध विकास कामांसाठी दिली जाते. मुद्रांक शुल्क अधिभाराची रक्कम मागील सहा वर्षांपासून शासनाकडे थकीत होती. ही थकीत रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याबाबतचा शासन निर्णय नगर विकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी जारी केला. ही रक्कम वितरीत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला देय असलेल्या रकमेमधून कोणत्याही प्रकारची कपात न करता हे अनुदान संबधित महापालिकांना येत्या ३१ मार्चपर्यंत देण्यात यावे, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT