पुणे

समाज विकास विभागातील १६० कर्मचारी कायम सेवेत

CD

पुणे, ता. ७ ः पुणे महापालिकेतील समाज विकास विभागातील मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या १६० सेवकांना महापालिका सेवेत कायम करून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, यासंदर्भात शासकीय आदेश नुकताच काढण्यात आला.
समुपदेशक, समूह संघटिका, कार्यालयीन सहायक, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, विरंगुळा केंद्र समन्वयक, स्वच्छता सेवक अशा १० पदांसाठी १८७ जागा असून, तेथे १६० जण काम करत आहेत. एकूण दहा पदनामांसाठी ही मान्यता देण्यात आली आहे. पुणे महापालिकेने समाज विकास विभागाचा हा १८७ जागांचा आकृतिबंध मान्य करावा व मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या १६० जणांना सेवेत सामावून घ्यावे, असा ठराव जानेवारी २०२० मध्ये केला होता. त्यानंतर या विषयाचा माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पाठपुरावा केला होता.
समाजविकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग, नगरविकास विभाग सकारात्मक असले तरी आदेश निघत नव्हते. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर हे प्रकरण मार्गी लागले, असे माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.

मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या १६० जनांना सेवेत सामावून घेतले जाईल. तसेच १८७ चा आकृतिबंध मंजूर केल्याने उर्वरित पदे थेट भरतीतून भरली जातील.
- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

ही आहेत मंजूर पदे
पदनाम पदसंख्या
- समुपदेशक - १९
- समूह संघटिका -९०
- कार्यालयीन सहायक - २०
- व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक - १
- रिसोर्स पर्सन ४
- सेवा केंद्र समन्वयक - ६
- संगणक रिसोर्स पर्सन -२
- सेवा केंद्र मुख्य समन्वयक - १४
- विरंगुळा केंद्र समन्वयक - १०
- स्वच्छता सेवक - २१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT