पुणे

शहरात हलक्या गरठ्याची अनुभूती

CD

पुणे, ता. २६ ः शहरात गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्यावेळी काहीसा गारठा जाणवू लागला आहे. कमाल आणि किमान तापमानात असलेली सरासरीपेक्षा घट यामुळे दिवसा उन्हाचा ताप असला तरी हलक्या गारठ्याची ही अनुभूती होत आहे. तर सोमवारी (ता. २७) शहर व परिसरात निरभ्र वातावरणासह सकाळी हलके धुके पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

रविवारी (ता. २६) शहरात ३४.६ अंश सेल्सिअस कमाल आणि १२.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, हे रविवारी राज्यातील नीचांकी तापमान होते. सरासरीपेक्षा किमान तापमानात चक्क चार अंशांनी घट झाली होती. त्यामुळे गारठा ही जाणवत होता. पुणे व परिसरातील ढगाळ वातावरणाची स्थिती निवळल्यानंतर कमाल व किमान तापमानात सरासरीपेक्षा होत असलेली घट सध्या कायम आहे. मार्च महिन्याची स्थिती पाहता यंदा १ ते २१ मार्च या कालावधीत शिवाजीनगर येथे सरासरी कमाल तापमान ३३.२ अंश सेल्सिअस होते. हे गेल्या वर्षी मार्च महिन्यातील याच कालावधीच्या तुलनेत २.६ अंश सेल्सिअस कमी आहे. तर मंगळवारी (ता. २१) शहरात २९.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. तर सरासरीपेक्षा कमाल तापमानात ७ अंशांनी घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर शहर व परिसरात मुख्यतः निरभ्र वातावरणाची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून (ता. ३१) दुपारनंतर अंशतः ढगाळ हवामानाची चिन्हे देखील वर्तविण्यात आली आहेत.

राज्यात ही सध्या उन्हाच्या चटक्यांची स्थिती पाहायला मिळत आहे. वाढत्या कमाल तापमानाबरोबर उकाडाही वाढत आहे. रविवारी राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद वर्धा येथे ३८.६ अंश सेल्सिअस इतकी झाली. मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३८ अंशांच्या दरम्यान होते. सोमवारी (ता. २७) विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस, मेघगर्जनेसह वारे वाहण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेसाठी काँग्रेसने राम मंदिराचा अपमान केला - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT