वेदान्तश्री
नेहमीच्या परंपरेला अनुसरून ‘मन व मानसशास्त्र’ हा केंद्रबिंदू मानून अंकाची मांडणी केली आहे. अच्युत गोडबोले यांच्या ‘मन एक शोध’ या लेखापासून अंकाची सुरवात झाली आहे. गीतेतील मनाचा विचार, संत ज्ञानेश्वरांचे मनविषयक चिंतन, आयुर्वेदाच्या दृष्टीने मनाचे वास्तव, मद्यपानामुळे मनाची होणारी अवस्था, साहित्यातील मन, संस्कृती-संस्कार यांचा मनाशी असलेला संबंध, समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकात केलेला उपदेश हे यंदाच्या अंकाचे वैशिष्टय आहे. मनाची अवस्था प्रत्येक लेखातून अचूकपणे टिपण्यात आली आहे. मानसिक आरोग्य आणि उपाययोजना, संगीताचा मनावर होणारा सकारात्मक परिणाम, मनाची अल्फा अवस्था व त्याचे येणारे अनुभव, जी.ए. कुलकर्णी यांच्या कलासृष्टीतून प्रकटणारे मानवी मन यावर मांडणी केलेली आहे.
संपादक ः सुनील उंब्रजकर, पाने ः २००, किंमत ः २५० रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.