पुणे

सकारात्मक शैक्षणिक बदलांसाठी कटिबद्ध - डॉ. सुरेश गोसावी

CD

पुणे, ता. १२ : ‘‘विविध उपक्रमांद्वारे शिक्षणात लैंगिक, सामाजिक समानता यावी, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने सकारात्मक शैक्षणिक बदलांसाठी कटिबद्ध आहोत,’’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘अलायंस ऑफ युनिव्हर्सिटीज टू रीइन्फोर्स टीचर ट्रेनिंग करिक्युलम टू आउटकास्ट रॅडीकॅलिजम अँड प्रमोट इक्वॅलिटी इन एशियन सोसायटीज (अरोरा) आंतरराष्ट्रीय परिषदेचे मंगळवारी उद्‌घाटन झाले. या वेळी स्पेनमधील मलागा विद्यापीठाचे डॉ. होसे जेजुस डेलगाडो पेना, जयपूरमधील बनस्थली विद्यापीठाचे प्रा. अजय सुराणा, स्वित्झर्लंडमधील युरोपियन युनियनचे डॉ. कार्लोस मॅकॅडो, जर्मनीमधील एलिझाबेथ स्मिथ, नेपाळमधील राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. रामकृष्ण तिमालसेना, नेपाळमधील त्रिभुवन कॉलेजचे संचालक डॉ. पूर्णा बहादूर काडेल, तमिळनाडूमधील अनुग्रह इन्स्टिट्यूटच्या मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. साईराज सँटीगो, नेपाळमधील पोखरा विद्यापीठातील प्रा. टेक बहादूर क्षत्री, मुंबईतील अड्यूलॅबचे प्रतीक गांधी यांच्यासह पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते.

डॉ. गोसावी म्हणाले, ‘‘अरोरा’च्या माध्यमातून आपण शैक्षणिक क्षेत्रात जो बदल घडवून आणू इच्छितो, तो बदल स्वीकारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’ शिक्षणात लिंग समानता, सामाजिक समानता, सामाजिक न्याय यांचा समावेश होऊन एक वैश्विक संघटन निर्माण करणे हे ‘अरोरा’चे उद्दिष्ट असल्याचे डॉ. होसे जेजुस डेलगाडो पेना यांनी सांगितले.

कार्यक्रमात भारतासह चेक रिपब्लिक, आयर्लंड, नेपाळ, रोमानिया, स्पेनमधील जवळपास ५० सदस्य उपस्थित होते. चार दिवस चालणाऱ्या परिषदेअंतर्गत अभ्यास दौऱ्यात ‘अरोरा’चे शिष्टमंडळ पुणे विद्यापीठाशी संलग्नित तीन महाविद्यालयांना भेट देणार आहेत. ‘अरोरा’ प्रकल्पाला युरोपियन कमिशनच्या माध्यमातून निधी साह्य मिळत असून विद्यापीठाचे डॉ. खरे हे प्रकल्पाचे गट प्रमुख आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT