पुणे

भरपूर पाणी प्या अन् सकस आहार घ्या

CD

पुणे, ता. १६ : हिवाळ्यात थंडीमुळे घाम येण्याचे प्रमाण कमी होते. त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसतो. त्वचा कोरडी पडते, फुटते, खरखरीत होते. त्यासाठी भरपूर पाणी प्या, सकस आहार घ्या आणि त्वचा ओलसर असताना मॉयश्चरायझर लावा, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांना दिला.
पुण्यात थंडीचा कडाका वाढला आहे. किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जाऊ लागले आहे. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत थंड रात्र आता पुणेकर अनुभवत आहेत. त्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. अशा वेळी त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, तेजस्वी आणि नितळ त्वचेमुळे व्यक्तिमत्त्व खुलते.

प्रत्येकाच्या त्वचेचा पोत वेगळा असतो. काहींची त्वचा सामान्य असते. काहीजणांची त्वचा कोरडी तर, काहींची अत्यंत संवेदनशील असते. या प्रत्येक प्रकारच्या त्वचेवर थंडीचा वेगवेगळा परिणाम होतो. त्यासाठी हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी, यासाठी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरते.
उन्हाळ्यात आपण आवर्जून पाणी पितो. पण, हिवाळ्यात पाणी कमी पिले जाते. त्याचा थेट परिणाम त्वचेच्या आरोग्यावर होतो. त्यासाठी आवर्जून पाणी प्यावे. सकस आहार घ्यावा, हिरव्या पालेभाज्या, मटार, लाल गाजर यांचा समावेश आहारात करावा, असा सल्ला संजीवनी व्हिटालाइफ मेडिपॉइंट रुग्णालयाच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तन्वी कोमावार यांनी दिला. मेकअप करणाऱ्या महिलांनी रात्री झोपण्यापूर्वी मेकअप व्यवस्थित स्वच्छ करावा. त्याशिवाय झोपू नये, असाही सल्लाही त्यांनी दिला.

ही घ्या काळजी
- सकाळी झोपेतून उठल्यावर थंड पाण्याने चेहरा धुणे टाळा. त्यातून त्वचा कोरडी पडते
- अंघोळीसाठी कोमट पाणी घ्या
- जास्त वेळ पाण्यात अंघोळ करू नका
- अंघोळ करताना शरीर जोरात घासू नका
- अंघोळ झाल्यावर ओलसर त्वचेवर लगेच मॉयश्चरायझर लावा
- ओठांवर लिफ बाम लावा

तापमान कमी झाल्याने गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय लागते. त्यामुळे त्वचा अजून कोरडी पडते. त्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ करावी. तसेच, वारंवार हात किंवा चेहरा धुणे टाळावे. मॉइश्चराझरचा नियमित वापर करावा. त्यातून त्वचेला थंडीपासून सुरक्षित ठेवता येते.
- डॉ. तन्वी कोमावार,
त्वचारोगतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT