पुणे

खाद्यपदार्थ टिकविणाऱ्या कॅनिंग तंत्राविषयी मार्गदर्शन

CD

पुणे, ता. ५ : खाद्यपदार्थ टिकविण्यासाठी ते हवाबंद डब्यात वा बाटल्यात भरून ठेवण्याची कॅनिंग प्रक्रिया करावी लागते. कॅनिंग तंत्रज्ञानाची ओळख, त्याचे फायदे, फळे व भाजीपाल्याची कॅनिंग प्रक्रिया कशी करतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवार (ता. ८) व रविवार (ता. ९) रोजी आयोजिली आहे.
कॅनिंग प्रक्रियेत उष्णतेने डब्याचे व खाद्यपदार्थाचे निर्जंतुकीकरण करावे लागते. यामध्ये कॅनिंगसाठी लागणारी आवश्यक मशिनरी, प्रोजेक्ट प्लॅनिंग, प्रोजेक्ट व ऑपरेशन्स मॅनेजमेंट, लघु उद्योगासाठी अंदाजे गुंतवणूक, स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अभ्यास, कॅनिंग पदार्थांचे पॅकेजिंग व लेबलिंग, कॅनिंग प्रक्रिया उद्योग कसा सुरू करावा आदींविषयी टर्नकी प्रोजेक्ट सल्लागार राजन वारे मार्गदर्शन करणार आहेत. फळे, भाजीपाला प्रक्रिया उद्योजक, नवउद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी, गृहिणी आदींसाठी कार्यशाळा फायदेशीर आहे. प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार रुपये.
ठिकाण : एसआयआयएलसी, सकाळ नगर गेट क्र.१, बाणेर रस्ता, औंध, पुणे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT