पुणे

पुण्यात तरुण होताहेत लठ्ठ

CD

पुणे, ता. ५ : तासन् तास एकाच जागी बसून काम करणे, कामाचा सातत्याने वाढणारा ताण, फास्टफुड आणि मद्यपानामुळे पुण्यातील तरुणपिढी लठ्ठ होत आहेत. शहरातील २५ वर्षांखालील ४७ टक्के मुली आणि ३९ टक्के मुले लठ्ठपणाच्या धोक्याच्या पातळीवर आहेत.
जागतिक आरोग्य दिना शुक्रवारी (ता. ७) आहे. त्यानिमित्त ‘इंडस हेल्थ प्लस’ने शहरात केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष निघाला आहे. पुण्यात जून २०२० ते डिसेंबर २०२२ दरम्यान केलेल्या १२ हजार जणांची प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे. शहरातील १७ टक्के महिलांना व २० टक्के पुरुषांना मधुमेह होण्याचा धोका आहे. आतापर्यंत केलेल्या एकूण तपासण्यांपैकी पुण्यातील ४० टक्के महिलांना व ३५ टक्के पुरुषांना एथेरोस्क्लेरोसिस होण्याचा धोका आहे.
इंडस हेल्थ प्लसचे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा विशेषज्ज्ञ अमोल नायकवडी म्हणाले, ‘‘तरुणांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. पुण्यातील महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त आहे. मधुमेह होण्याचा धोका कमी करण्यासाठी वेळेवर वैद्यकीय तपासणी करणे महत्त्वाचे असते. नियमित शारीरिक व्यायाम आणि चौकस आहारामुळे लठ्ठपणाचा धोका निश्चित कमी होऊ शकतो. कोरोनानंतर लोक त्यांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक बनले आहेत आणि तरुण पिढी व कुटुंबातील सदस्यांसह नियमितपणे आरोग्य तपासणी करण्यास येत आहेत.’’

या सर्वेक्षणातील निष्कर्ष :
- २९.३ टक्के महिलांना अॅनेमिया होण्याची शक्यता आहे, तुलनेत हे प्रमाण पुरुषांसाठी ५.६ टक्के आहे.
- कोरोना उद्रेकाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये आणि नंतरच्या काळात पुरुष व महिलांमध्ये उच्च रक्त दाबाच्या प्रमाणात वाढ
- उच्च रक्तदाबासह मधुमेह आणि इतर अनेक आजार होण्यासाठी तणाव हा सर्वात महत्त्वपूर्ण कारणीभूत घटक
- दैनंदिन ताणतणाव कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम, ध्यान, योगासने अपरिहार्य

संतुलीत जीवनशैली आवश्यक
सुदृढ आरोग्यासाठी संतुलीत जीवनशैली आवश्यक आहे. त्यात आहार, विहार, प्राणायाम, ध्यान, मनःशांती यावर तरुणांनी लक्ष देण्याची ही वेळ आहे. तसेच, आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो होणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच, नियमित प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करण्याची गरज असल्याचेही या अभ्यासातून अधोरेखित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

SBI Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 84 पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची शेवटची तारीख

'लाल लाल कलरची बांगडी...'वर पाठराखीणच्या अभिनेत्रींचा भन्नाट डान्स; संजू राठोड म्हणाला, 'खूप भारी' Viral Video

Rohini Devba : पोरीसाठी बापानं बकरी विकून विमानाचं तिकीट काढलं; हरियाणाच्या 9 पैलवानांना धूळ चारणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकीची जागतिक भरारी, पण पैशांअभावी अडलं 'स्वप्न'

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT