पुणे

रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी प्रशिक्षण

CD

पुणे, ता. १४ : ‘सकाळ माध्यम समूहा’ची शैक्षणिक संस्था असणाऱ्या ‘एसआयआयएलसी’ला रिअल इस्टेट एजंट प्रमाणन प्रशिक्षणासाठी महारेराकडून अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. संस्थेतर्फे २० तासांचे ऑनलाइन तसेच ३ दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण घेतले जात आहे. ऑनलाइन तसेच ऑफलाइन प्रशिक्षणाच्या पुढील बॅच सोमवारपासून (ता. १७) सुरु होत आहेत. महारेराने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त डिजिटल मार्केटिंग व वास्तुशास्त्र या विषयांच्या कार्यशाळा प्रशिक्षणात होणार आहेत.
नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी महारेराने प्रशिक्षण व प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. नोंदणीकृत एजंटमार्फतच मालमत्ता खरेदी करावी असे आवाहन महारेराने ग्राहकांना केले आहे तसेच नोंदणीकृत नसणाऱ्या एजंटना महारेराच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रशिक्षण पूर्ण करणे तसेच एप्रिल व मे महिन्यात महारेरातर्फे होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

हे लक्षात ठेवा
प्रतिव्यक्ती शुल्क : पाच हजार अधिक जीएसटी.
ऑफलाइन प्रशिक्षणाचे ठिकाण : एसआयआयएलसी, सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क : ७३५०००१६०३, ९१३००७०१३२, ८९५६३४४४७५.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : शंभूराज देसाई यांनी बजावला मतदानाचा हक्क!

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT