पुणे

‘आर्किटेक्चर’मध्ये अमर्याद संधी

CD

पुणे, ता. १९ ः आर्किटेक्ट केवळ वैयक्तिक व्यवसायापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर ते आता आंतरराष्ट्रीय उद्योगांचे स्वरूप धारण करत आहेत. वाढत्या शहरीकरणात शाश्वत विकासासाठी आर्किटेक्टची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. बदलती धोरणे आणि व्यवसायामुळे या क्षेत्रात अमर्याद संधी उपलब्ध होत असून, विद्यार्थ्यांची मात्र वानवा आहे, असा सूर शहरातील नामवंत आर्किटेक्ट महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि प्राचार्यांनी ‘सकाळ’च्या व्यासपीठावर व्यक्त केला.
आर्किटेक्ट अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन व्हावे, या क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत एकाच व्यासपीठावर माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने ‘सकाळ आर्किटेक्ट कॉन्क्लेव्ह’ आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेची पूर्वतयारी म्हणून शहरातील विधी महाविद्यालयांतील प्राचार्य आणि प्राध्यापकांना ‘सकाळ’ कार्यालयात निमंत्रित केले होते. या वेळी उपक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करण्यात आली. आर्किटेक्चरमध्ये करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही कॉन्क्लेव्ह पार पडेल.

उपस्थित प्राचार्य आणि प्राध्यापक
डॉ. बनानी बॅनर्जी (सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर), प्रा. वीणा शेणवी (अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर), डॉ. कविता मुरूगकर (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर), प्रा. शुभदा चापेकर (अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ-स्कूल ऑफ आर्किटेक्चर), डॉ. आश्विनी पेठे (एमआयटीड-एडीटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर) डॉ. सुधीर चव्हाण (एसकेएन कॉलेज ऑफ आर्किटेक्चर), शुभाशिनी उपासनिक (एसएसएमएस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर), ऋतुराज कुलकर्णी (एस. बी. पाटील कॉलज ऑफ आर्किटेक्चर), महेश बांगड (एमकेएसएसएस डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमन), डॉ. शुभांगी शिरोळे (एमएमआयडीएस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर), डॉ. महेंद्र सोनवणे (एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन), स्वप्नील शेठ (इंदिरा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन), सुनिलकुमार भोसले (अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर), प्रा. चंद्रकांत कटारिया (एसएसएमएस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर), स्निग्धा शेवाळे (ट्रिनीटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर), डॉ. मंजुशा गोखले (सिंबायोसिस स्कूल ऑफ आर्किटेक्चर), प्रा. श्रीकांत निकम (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर) डॉ. पूर्वा केसकर आणि मनाली देशमुख (एसएमइएफएस ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्चर), प्रा. चेतन कांबळे (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर), विशाखा पायगुडे (अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्ट).

बैठकीतील महत्त्वाचे निष्कर्ष
- संपूर्ण व्यवसायाचे बदलत आहे
- आर्किटेक्चरमधील करिअर संधींत वाढ
- नवीन शैक्षणिक धोरणामुळे नवे आयाम खुले
- कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आदींमुळे नव्या संधी
- संघटित क्षेत्राकडे वाढता कल
- विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्ये जागृतीची गरज

तुम्हाला ‘आर्किटेक्ट’मध्ये करिअर करायचं का! मग आजच क्यूआर कोड स्कॅन करून करा नोंदणी ः

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT