पुणे

एपीजी-एसआयआयएलसी

CD

सकाळ ता. २६ एप्रिल, बुधवार प्रसिद्धीसाठी बातमी
सर्व आवृत्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

फळे-भाजीपाला कॅनिंग प्रक्रिया व स्टार्टअपच्या संधी
पुणे, ता. २५ : खाद्यपदार्थ टिकविण्यासाठी ते हवाबंद डब्यांत वा बाटल्यांत भरून ठेवण्याची कॅनिंग प्रक्रिया करावी लागते. काय आहे हे कॅनिंग तंत्रज्ञान, त्याचे फायदे काय, फळे-भाजीपाल्यात कॅनिंग प्रक्रिया कशी करतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण शनिवारी (ता. २९) व रविवारी (ता. ३०) रोजी आयोजित केले आहे. कॅनिंग तंत्रज्ञान, त्यासाठी लागणारी आवश्यक मशिनरी, प्रोजेक्ट प्लॅनिंग, प्रोजेक्ट व ऑपरेशन्स मॅनेजमेंट, लघु उद्योगासाठी अंदाजे गुंतवणूक याविषयी टर्नकी प्रोजेक्ट सल्लागार राजन वारे हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कॅनिंग अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान ओळख व संधी, स्थानिक, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अभ्यास, या विषयीही मार्गदर्शन होणार आहे. फळे, भाजीपाला प्रक्रिया उद्योजक, नवउद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी, गृहिणी आदींसाठी हे प्रशिक्षण फायदेशीर आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४ हजार रुपये.

प्रात्यक्षिकासह शिका व्यावसायिक मसाले बनविण्याचे तंत्र
घरगुती चवीचे, विविध प्रकारचे, झणझणीत कोल्हापूर स्टाइल व्यावसायिक मसाले प्रात्यक्षिकासह शिकवणारी कार्यशाळा शनिवारी (ता. २९) व रविवारी (ता. ३०) आयोजित केली आहे. यात सुमारे दहा प्रकारचे व्यावसायिक मसाले प्रत्यक्ष तयार करून शिकविले जातील. त्याच्या नोट्स पुरवल्या जातील. यामध्ये गरम, बिर्याणी, चिकन, मटन, काळा, चाट, मिसळ, चहा, गोडा आदी प्रकारच्या मसाल्यांसहित कोल्हापुरी कांदा-लसूण चटणीचा समावेश आहे. मसाला उद्योगाला बाजारपेठेत असलेल्या विविध संधी, या व्यवसायाचे पॅकिंग व ब्रँडिंग परवाने, व्यवसायाचे अर्थशास्त्र, व्यावसायिक पद्धत, व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरी आदींविषयी माहिती दिली जाणार आहे. आजवर अनेक मसाला उद्योजक घडविणाऱ्या तज्ज्ञ गंधाली दिंडे यांचे मार्गदर्शन कार्यशाळेत होणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार रुपये. एकत्रितपणे पाच नोंदणी करणाऱ्या समुहाला दीड हजार रुपये सवलत देण्यात येणार आहे.

दोन्ही कार्यशाळांसाठी संपर्क : ९१४६०३८०३१.
ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT