पुणे

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

CD

पुणे, ता. २७ : शहरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने नुकतीच अटक केली. त्याच्या ताब्यातून सुमारे ११ लाख रुपये किमतीचे दोनशे ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपी जयवंत ऊर्फ जेडी गोवर्धन गायकवाड (वय ३४, रा. आंबेडकर वसाहत, डीपी रोड, औंध) हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध पुणे शहर परिसरात घरफोडी आणि चोरीचे ८० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भूमकर चौक, नऱ्हे भागात असल्याची माहिती युनिट तीनचे सहायक फौजदार संतोष क्षीरसागर यांना मिळाली. त्यानुसार त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने सिंहगड रोड, सांगवी आणि तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या केल्याचे सांगितले. त्याच्याकडून ११ लाखांचे दोनशे ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले. त्याच्याकडून सिंहगड रोड हद्दीतील एक, सांगवी तीन आणि तळेगाव दाभाडेतील एक असे पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे-१ सुनील पवार, युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, राहुल पवार, सहायक फौजदार संतोष क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT