पुणे

‘जेईई ॲडव्हान्स’साठी अडीच लाख विद्यार्थी पात्र

CD

पुणे, ता. २९ : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात आलेल्या दुसऱ्या सत्रातील ‘जेईई मेन २०२३’ परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. परीक्षेत ४३ विद्यार्थ्यांना १०० एनटीए स्केाअर मिळाला आहे, तर जेईई मेन परीक्षेच्या निकालाच्या आधारे देशातील जवळपास अडीच लाख विद्यार्थी जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत.
‘एनटीए’च्या वतीने ‘जेईई मेन’ची परीक्षा दोन सत्रात घेण्यात येते. त्यानुसार पेपर एक (बी.ई./बी.टेक) दुसऱ्या सत्रातील परीक्षा ६,८,१०,११,१२,१३ आणि १५ एप्रिलदरम्यान झाली. देशातील तब्बल नऊ लाख ३१ हजार ५१० विद्यार्थ्यांनी ‘पेपर एक’साठी नोंदणी केली. त्यातील आठ लाख ८३ हजार ३७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. देशातील जवळपास सहा लाख २९ हजार विद्यार्थ्यांनी जानेवारी आणि एप्रिल अशा दोन्ही सत्रांतील परीक्षेसाठी नोंदणी केली असून, त्यातील पाच लाख ९४ हजार १३ विद्यार्थ्यांनी दोन्ही सत्रातील परीक्षा दिली. देशातील तीन लाख ३८ हजार ९६३ विद्यार्थिनींनी, तर सात लाख ७४ हजार ३५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
ही परीक्षा इंग्रजी, मराठीसह आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम्‌, ओडिशा, पंजाबी, तमिळ, तेलगु आणि उर्दू अशा १३ भाषांमधून देश-विदेशातील ३२५ शहरांमध्ये ४५७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. बी. आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या पेपर दोन (ए) आणि बी. प्लॅनिंग अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या पेपर दोन (बी) परीक्षेचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे.

अशी झाली परीक्षा
- ‘जेईई ॲडव्हान्स’साठी दोन लाख ५० हजार २५५ विद्यार्थी पात्र
- विदेशात परीक्षा झालेली काही शहरे : दुबई, टोरॉटो, पॅरिस, बर्लिन, दोहा, काठमांडू, सिंगापूर
- इंग्रजीसह १३ भाषांमध्ये परीक्षा
- दोन्ही सत्रांतील परीक्षा देणारे विद्यार्थी : ५,९४,०१३

४३ विद्यार्थ्यांना १०० एनटीए गुणांक
या परीक्षेत ४३ विद्यार्थ्यांना १०० एनटीए स्कोअर मिळाला आहे. महाराष्ट्रातील मृणाल वैरागडे, रोहित सोमणी यांनी १०० एनटीए स्कोअर मिळविला असून, ते राज्यात ‘टॉपर’ आहेत. तेलंगणामधील ११, आंध्र प्रदेशातील ५ आणि उत्तर प्रदेशातील ४ यांच्यासह अन्य राज्यांतील एकूण ४३ विद्यार्थ्यांना १०० एनटीए स्कोअर मिळाला आहे.
.....
*अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :*
- www.nta.ac.in
- https://jeemain.nta.nic.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT