पुणे

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला आग

CD

पुणे, ता. २९ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऐतिहासिक मुख्य इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी आग लागली. इमारतीवरील राष्ट्रध्वज उतरविण्यासाठी जाणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी आग विझविली आणि अग्निशमन दलालाही पाचारण केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य इमारतीच्या छतावर स्थावर विभागाकडून डांबरकाम करण्यात येत होते. त्यातील डांबर वितळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हिटरमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. इमारतीच्यावर लाकडाचे बांधकाम, त्यात डांबरशीटाने पेट घेतल्याने लवकरच आग धुमसली. सुरक्षा रक्षकांनी तातडीने अग्निशमन यंत्रणेचा वापर केला, तसेच अग्निशमन दलालाही पाचारण केले. मुख्य इमारतीला लागलेली आग म्हणजे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्टुडंट हेल्पींग हॅंडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी केला. ते म्हणाले, ‘‘वारसा स्थळ असलेल्या इमारतीचे ऑडिट होणे गरजेचे आहे. या ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या वास्तुकडे विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्षिपणा दिसून येत आहे.’’ कुंपणे वाढविण्यापेक्षा इमारतीच्या सुरक्षेकडे लक्ष द्या, असेही आंबेकर म्हणाले.

पावसाळ्यापूर्वी मुख्य इमारतीवर डांबराचे शीट लावण्याचे काम करण्यात येते. डांबरशीटनेच पेट घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर काळा धूर निघाला. खबरदारी म्हणून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. १५ मिनिटांच्या आत आग विझली असून, कोणतेही नुकसान झालेले नाही.
- डॉ. प्रफुल्ल पवार,
कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT