पुणे

बेशिस्त वाहनचालकांवर पुणेकरांचा आसूड

CD

पुणे, ता. ३० : तरुण मुले नियमांचे उल्लंघन करीत बेदरकारपणे वाहने चालवितात, त्यांच्यामुळे दुसऱ्यांच्या जिवाला धोका आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, विनाकारण हॉर्न वाजविण्याचेही प्रकार सुरू आहेत. त्यांच्यावरही पोलिसांनी कडक कारवाई करावी, पोलिसांनी दंडात्मक कारवाईपेक्षा वाहनचालकांना शिस्त लावण्यास प्राधान्य द्यावे, असे सांगत नागरिकांनी बेशिस्त वाहनचालकांवर आसूड ओढला.

पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी ‘कोणे हा माठ’ ही मोहीम राबविली जात आहे. त्याबाबत काही नागरिकांनी ‘सकाळ’कडे आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. तर काहींनी पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या ट्विटरवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रतिक्रिया देणाऱ्या नागरिकांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे, त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक पोलिसांनाही धारेवर धरले आहे.

नागरिक म्हणतात...
‘कोणे हा माठ’ च्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांबाबत जागृत केले जात आहे. बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण वाढत आहे. अल्पवयीन मुले नियामांचे उल्लंघन करीत भरधाव वाहने चालवित नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करीत आहेत. वाहतूक पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता कायद्याचा बडगा उगारला पाहिजे.
- अजित भंडारी

या उपक्रमात वाहनाद्वारे प्रवास करताना नियम तोडणाऱ्यांच्या डोक्‍यावर माठ दाखविला आहे, त्याच पद्धतीने चौकापुढे उभे राहून नागरिकांची वाहने अडवून त्यांच्या पावत्या फाडणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या डोक्‍यावरही माठ दाखवा. वाहतूक नियमनापेक्षा हेल्मेट कारवाईवर त्यांचे जास्त लक्ष असते. चौकात कोंडी असताना, पोलिस मोबाईल बघत बसलेले असतात. मग ते माठ नाहीत का?
- नीता नाटेकर

शनी मंदिर रस्त्यावरील एका शाळेच्या बस दररोज सकाळी रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या असतात. त्यांच्या पार्किंग करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे वाहनचालकांवर विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याची वेळ येत आहे.
- नितीन जोशी

बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप बागेजवळ ‘नो एंट्री’चा फलक असतानाही वाहनचालक अचानक कुठूनही एकतर्फी मार्ग असणाऱ्या रस्त्यावर गाड्या घालतात. इथे एकतर सिग्नल बसवा किंवा वाहतूक पोलिस ठेवा. सतत अपघात होऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- संकेत चव्हाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT