पुणे

‘पूर्व प्राथमिक शिक्षणावर नव्या शैक्षणिक धोरणात भर’

CD

पुणे, ता. ३ : ‘‘जीवनात यशाची शिखरे गाठताना मिळवलेला काठीचा आधार म्हणजे शिक्षण. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालवाडी ही ‘फॉर्मल’ शिक्षणात समाविष्ट केली आहे. पूर्व प्राथमिक विभागातच मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणावरच अधिकाधिक भर दिला आहे,’’ असे सांगत शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

वनाज परिवार विद्या मंदिर शाळेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी कार्यशाळा नुकतीच झाली. यात डॉ. देशमुख यांच्यासह डॉ. प्राची चौधरी यांनी मार्गदर्शन केले. रोटरी क्लब ऑफ विस्डम यांच्या सहकार्यातून ही कार्यशाळा घेण्यात आली. तंत्रज्ञानाचा अभ्यास करून शिक्षणात त्याचा अधिकाधिक वापर करून शिक्षण कसे प्रभावी करता येईल, याबाबत डॉ. चौधरी यांनी सांगितले. या वेळी पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शीतल देशमुख, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनिता दारवटकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वृषाली वाशिमकर, रोटरी क्लब ऑफ विस्डमच्या अध्यक्षा वैशाली वारणेकर यांच्यासह विविध शाळांमधील १५० शिक्षक सहभागी झाले होते. माया झावरे यांनी प्रास्ताविक केले, तर अर्चना जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT