पुणे

बंद आरोग्य योजनांची पुनर्रचना करा ः मोहोळ

CD

पुणे, ता. ४ ः पुणे महापालिकेतर्फे गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य योजनांसाठी यंदाच्या २०२३-२४ वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद न करता आयुक्त विक्रम कुमार यांनी त्या योजना बंद केल्या आहेत. त्या बंद न करता त्यांची पुनर्रचना करून त्याचा लाभ नागरिकांना द्या, अशी मागणी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

मोहोळ म्हणाले, या दोन्ही योजना गरजू पुणेकरांसाठी पुन्हा सुरू होणे आवश्यक असून प्रशासनाने या योजनांचा तातडीने अभ्यास करून पुनर्रचना करणे आवश्‍यक आहे. शिक्षण विभागातील रजामुदतीच्या ९३ शिक्षकांना सेवेत कायम करणे आणि १५२ समूह संघटक आणि संघटिका यांना सेवेत कायम करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत आले आहे. तेथे महापालिकेतर्फे जिजाऊ मॉसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य शिल्प साकारण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT