पुणे

जिल्ह्याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल

CD

पुणे, ता. ९ ः पुणे जिल्ह्यातील ८४२ कुपोषित बालके गेल्या वर्षभरात कुपोषणमुक्त झाली आहेत. त्यासाठी ग्राम बालविकास केंद्रांचा (व्हीसीडीसी) मोठा फायदा झाला आहे. या केंद्रांमुळे कुपोषित बालकांची संख्या २५ टक्क्यांच्या आत आली आहे. सध्या जिल्ह्यात केवळ ३५० बालके कुपोषित आहेत. त्यांना कुपोषणमुक्त करण्यासाठी ग्राम बालविकास केंद्रांत दाखल केले जाणार आहे.
कुपोषित बालकांसाठी जिल्ह्यात २८८ ग्राम बालविकास केंद्र सुरू करणार आहेत. अतितीव्र कुपोषित (सॅम) आणि तीव्र कुपोषित (मॅम) बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करणार आहे. त्यासाठी ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये खास आरोग्य शिबिरांचे आयोजन करणार आहे. तपासणीनंतर या बालकांना ग्राम बालविकास केंद्रात दाखल करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी सांगितले.

कोरोनात संख्या दोन हजारांवर
साधारणतः जिल्ह्यात वर्षभरात एक हजारांच्या आसपास कुपोषित बालकांची संख्या असते. मात्र, कोरोना संसर्गाच्या काळात जानेवारी २०२२ मध्ये कुपोषित बालकांची संख्या (सॅम व मॅमसह) २ हजार ९६ वर गेली होती. तत्पूर्वीची सहा महिने अगोदर म्हणजेच जूलै २०२१ मध्ये हीच संख्या केवळ ६६० इतकी होती. जानेवारी २०२२ मध्ये एकूण कुपोषित बालकांमध्ये ४०४ बालके ही अतितीव्र कुपोषित (सॅम) तर, एक हजार ६९२ बालके ही तीव्र कुपोषित (मॅम) असल्याचे महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून‌ स्पष्ट झाले होते.

कुपोषणमुक्तीसाठी मोहीम
- कुपोषित बालकांचा शोध घेणे
- कुपोषणाची कारणे शोधणे
- बालकांना सकस आहार देणे
- योग्य औषधोपचार करणे
- ग्राम बालविकास केंद्रांची स्थापन


जिल्ह्यातील स्थिती दृष्टीक्षेपात
- जानेवारी २०२२ ः कुपोषित बालके ः २०९६
- जून २०२२ ः कुपोषणमुक्त बालके ः ९०४
- जून २०२२ ः कुपोषितांची संख्या ः ११९२
- वर्षभरात कुपोषणमुक्त झालेली बालके ः ८४२
- सध्या जिल्ह्यातील कुपोषित बालके ः ३५०
- एकूण ३५० पैकी अतितीव्र (सॅम) कुपोषितांची संख्या ः ३६
- तीव्र कुपोषित (मॅम) बालके ः ३१४

तालुकानिहाय कुपोषित बालके (सॅम, मॅमसह)
आंबेगाव- ४५
बारामती- २४
भोर- ०८
दौंड- १३
हवेली- ०९
इंदापूर- ३१
जुन्नर- ५८
खेड- ५८
मावळ- १९
मुळशी- ०६
पुरंदर- ३०
शिरूर- २५
वेल्हे- २४
एकूण- ३५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT