पुणे

सीबीआरएन उपकरणांचे प्रदर्शन उत्साहात

CD

पुणे, ता. ११ ः राष्ट्रीय संगणक शिक्षण मंडळाच्या (एनबीसीबी) पुणे शाखेतर्फे औंध येथे रासायनिक, जैवशास्त्रीय, रेडिओलॉजिकल आणि आण्विक (सीबीआरएन) बाबींविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सीबीआरएन उपकरणांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

हे प्रदर्शन संरक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आले होते. सीबीआरएनबाबत संरक्षणात्मक उपकरणे, सीबीआरएन घटकांमुळे झालेले प्रदूषण दूर करणारी उपकरणे, ‘एनडीआरएफ’द्वारे सीबीआरएन घटकांशी संबंधित आपत्कालीन संरक्षण आणि बचाव कवायती आदी या वेळी नागरिकांना पाहण्याची संधी मिळाली. या प्रदर्शनात एनबीसीबीबरोबर विक्रेते, सरकारी विभाग आणि प्रयोगशाळांद्वारे मोठ्या संख्येने त्यांच्या वस्तू तसेच अत्याधुनिक उपकरणे मांडण्यात आली होती. सीबीआरएन घटकांमुळे होणाऱ्या जल प्रदूषणापासून संरक्षण, या विषयावरील प्रदर्शनात जलशक्ती मंत्रालयाचा मोठा सहभाग होता. सार्वजनिक क्षेत्रातील आणि विविध संरक्षण प्रशिक्षण संस्था या प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT