पुणे

कोरेगाव पार्कमधील स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय

CD

पुणे, ता. १४ : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दोन महिन्यांत मसाज पार्लर आणि स्पा सेंटरमध्ये छापा टाकून सात परदेशी तरुणींसह १२ पीडित तरुणींची सुटका केली. या घटनांवरून उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्क परिसरात स्पा सेंटर आणि मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याचे समोर आले आहे.

कोरेगाव पार्क परिसरात स्पा सेंटर आणि मसाज पार्लरचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांत सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईवरून ही बाब समोर आली. हेल्थ लॅड क्लिनिक, थाई स्पा व हेल्थ स्पॉट क्लिनिक, थाई स्पा, कोरेगाव पार्क येथे मसाज पार्लरच्या नावाखाली तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी शनिवारी (ता. १३) स्पा सेंटरमध्ये छापा टाकून तीन परदेशी आणि दोन भारतीय अशा पाच तरुणींची सुटका केली. यापूर्वी एका स्पा सेंटरमधून चार परदेशी तरुणींसह सात तरुणींना ताब्यात घेतले. त्यांची रेस्क्यू फाउंडेशनमध्ये रवानगी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष?
कोरेगाव पार्क परिसरात गुन्हे शाखेने दोन महिन्यांत मसाज पार्लर आणि स्पा सेंटरवर छापा टाकून १२ पीडित तरुणींची सुटका केली. त्यामध्ये सात परदेशी तरुणींचा समावेश आहे. या बाबींकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT