पुणे

पहिले ‘एक्‍झिम ट्रेड प्रदर्शन’ शनिवारी होणार पुण्यात

CD

पुणे, ता. १५ ः एक्‍झिम इंटिग्रेटेड क्‍बलच्यावतीने (ईआयसी) येत्या शनिवारी (ता.२०) पहिले ‘एक्‍झिम ट्रेड प्रदर्शन’ भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन डेक्कनजवळील आपटे रस्त्यावरील सेंट्रल पार्क येथे दुपारी दोन ते रात्री आठ या वेळेत होणार आहे.

‘ईआयसी’ हा संपूर्ण व्यापारासाठी आणि चांगल्या व्यापार पद्धतींच्या देवाणघेवाणला प्रोत्साहन देणारा लॉजिस्टिक सेवा श्रेणीतील सदस्य असणारा हा गट आहे. कामाच्या ठिकाणी महिला कल्याणाचे सशक्तीकरण व प्रचार करण्याच्या उद्देशाने ‘ईआयसी’चा महिला विभागही सक्रिय आहे. याच विभागाकडून हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. त्यामध्ये शिल्पा सोनपत्की, शिब्बु सिंग, दीप बड्डाप, सोनाली गायकवाड यांच्या नेतृत्वात, ईआयसी टिम, कोअर पॅन इंडिया समितीचाही या उपक्रमास पाठिंबा मिळाला आहे. संबंधित प्रदर्शन सर्व एक्‍झिम ट्रेड सदस्य, निर्यातदार, आयातदार, व्यापार सल्लागार, लॉजिस्टिक सेवांशी संबंधित विविध घटकांचा या प्रदर्शनामध्ये सहभाग असणार आहे. संबंधित प्रदर्शन विनामूल्य नोंदणीसह खुले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शशिकांत कुलकर्णी यांनी दिली आहे.
------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: पॉवर-प्ले कोलकाताच्या गोलंदाजांनी गाजवला, सलामीवीरांनंतर शाय होपदेखील परतला पॅव्हेलियनमध्ये

SCROLL FOR NEXT