पुणे

संयुक्त राष्ट्राच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह

CD

पुणे, ता. १६ : संयुक्त राष्ट्राच्या वतीने ७ युएन रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (ता. १५) ते रविवार (ता. २१) दरम्यान हा सप्ताह साजरा होणार आहे. २०३० पर्यंत रस्ते अपघातांची संख्या निम्म्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून यासाठी चालणे, सायकलिंग, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही यंदाची थीम आहे. रस्ते सुरक्षा बाबत नागरिकांचे प्रबोधन व्हावे, या करिता आरटीओ प्रशासनाने या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या सप्ताहाचे उद्‌घाटन सोमवारी सकाळी १० वाजता सिंहगड कॉलेज येथे झाले. याप्रसंगी सिंहगड कॉलेजचे प्राचार्य एस. डी. लोखंडे व उपप्राचार्य वाय. पी. रेड्डी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील, मोटार वाहन निरीक्षक शाहीद जमादार, दिनेश पाटील, ऋषिकेश कोरडे, दीपा ताम्हणे, राजकुमार नरसंगोडे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी युवराज पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे दिले. तसेच प्रामुख्याने हेल्मेट विषयी प्रबोधन केले. वाहन चालविताना गती पेक्षा सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी सायकल चालवून सायकल डे साजरा करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT