पुणे

जेजुरीचा खंडोबा अन् मल्हार गौतमेश्वर मंदिर

CD

पुणे परिसर दर्शन : भाग ४६

जेजुरी गडावर खंडोबाच्या दर्शनाला अनेक भक्त येतात. अनेकांचे ते कुलदैवत आहे. खंडोबा हे शिव, भैरव आणि सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे. १६०८मध्ये मंदिराचे बांधकाम झाले, तसेच सभामंडपावरील इतर काम १६३७ मध्ये राघो मंबाजी या सरदाराने केले. पुरातन मंदिर आणि वास्तुकलेच्या बांधकामातील एक महत्त्वाचा टप्पा असे या मंदिराबद्दल म्हणता येईल.
मल्हारराव यांचे वडील होळ येथे स्थायिक झाले. गावच्या नावावरून त्यांचे होळकर हे आडनाव पडले. बाजीराव पेशवे यांच्या बरोबर मल्हारराव सहभागी झाले आणि त्यांनी उत्तरेत मराठेशाहीची सत्ता मजबूत केली. २० मे १७६६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे स्मारक म्हणून सन १७९० च्या सुमारास मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिराची उभारणी तुकोजी होळकर यांनी केली. पूर्वाभिमुख असलेल्या छत्री मंदिराचे बांधकाम अतिशय प्रमाणबद्ध व रेखीव असून मंदिराचे मंडप व गर्भगृह असे दोन भाग आहेत. मंडपाचे छत घुमटाकार असून मंडपात सुरेख कोरीव काम केलेल्या दगडी खिडक्या आहेत. गर्भगृहात लाकडी मेघडंबरीमध्ये संगमरवरी शिवलिंग असून त्याच्या मागे मध्यभागी सुभेदार मल्हारराव होळकरांची संगमरवरी बैठी मूर्ती आहे, तर त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांच्या पत्नी गौतमाबाई व बनाबाई यांच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर चौथऱ्यावर कोरीव नंदीचे भव्य शिल्प आहे, नंदीच्या गळ्यातील घंटा, साखळी व झुलीवरील नक्षी सुबकरित्या कोरलेली आहे.
जेजुरीच्या पश्चिमेस चौकोनी तलाव आहे. हा १७७० मध्ये होळकरांनी बांधला, येथून पाणी व्यवस्थापन केले होते. तसेच काठावर चिंचबन तयार करून भाविकांची सावलीची सोय केली होती. या तलावाच्या पूर्वेस जनाईदेवी आणि बल्लाळेश्वर महादेवाचे मंदिर व पुष्करणी आहे, जेजुरीकडून पुण्याच्या रस्त्यावर लवथळेश्वर मंदिर आहे. जमिनीपासून खाली उतरून या महादेवाचे दर्शन घ्यावे लागते. लवथवती विक्राळा ही प्रसिद्ध आरती समर्थांनी इथेच लिहिली, असे म्हटले जाते. तसेच गावाचे आग्नेयेस एक वर्तुळाकृती तलाव आहे, जो बाजीराव पेशवे यांनी सन १७३४ ते १७४० दरम्यान बांधला. याच्या दगडी भिंतीजवळ एक बल्लाळेश्वराचे वैशिष्ट्य पूर्ण मंदिर आहे.

काय पहाल?
जेजुरी गडावर खंडोबा मंदिर, जवळच असलेले कडेपठार, त्यावरील मंदिरे, मल्हार गौतमेश्र्वर छत्री मंदिर, जनाई मंदिर, मल्हार तीर्थ, होळकरांनी बांधलेला तलाव, बाजीराव पेशव्यांनी बांधलेले तळे, लवथळेश्वर मंदिर

कसे जाल?
पुण्याहून जेजुरीला बसने जाता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT