पुणे

आदर्श जीवनशैलीद्वारे मधुमेहावर मात शक्य ः डॉ. नांदेडकर

CD

पुणे, ता. १७ ः ‘‘संतुलित सकस आहार, न कंटाळता नियमितपणे केला जाणारा व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि योग्य उपचार या आदर्श जीवनशैलीचे पालन केल्यास मधुमेहावर मात करणे शक्य आहे,’’ असा सल्ला मधुमेहतज्ज्ञ डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी दिला.
‘अनुयश आरोग्य प्रतिष्ठान’तर्फे आयोजित ‘मधुसंवाद’ या विशेष मोफत कार्यक्रमात ‘मधुमेह आणि जीवनशैली’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. नांदेडकर बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर, अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या सचिव रूपाली नांदेडकर, विश्वस्त विलास नेवपूरकर आणि अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या वैद्यकीय विभागाच्या सदस्या डॉ. हेमा ऐरावर आणि डॉ. मुकुंद घोडके आदी उपस्थित होते.
डॉ. नांदेडकर म्हणाले, ‘‘कामाच्या बदलेल्या वेळा, तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर, पॅक आणि फास्टफूडला दिले जाणारे प्राधान्य, पोषक आणि सकस आहाराचा अभाव, व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष या आजच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह वाढत आहे. गेल्या दहा वर्षांचा आढावा घेतला, तर गेल्या दशकात भारताची लोकसंख्या दीड पटीने वाढली आहे, तर याच कालावधीत भारतातील मधुमेहींची संख्याही दहा पटींनी वाढली आहे.’’
‘‘सूर्योदयापूर्वी झोपेतून उठणे, रोज किमान तीन किलो मीटर चालण्याचा व्यायाम करणे, न्याहारीसह दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळा पाळणे, वैद्यकीय सल्ल्यानुसार आहार घेणे आणि रात्री जास्तीत जास्त दहा वाजता झोपणे या काही मूलभूत गोष्टींचा अंगीकार मधुमेहींनी केल्यास त्यांना आजारावर मात करणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गावस्कर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ममता क्षेमकल्याणी यांनी केले. विलास नेवपूरकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT