पुणे

एनएनएस कार्यक्रम अधिकाऱ्यांचे पुण्यात अधिवेशन

CD

पुणे, ता. २४ : राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांचे अधिवेशन आणि पंचप्रण युवा संवाद कार्यक्रम शुक्रवारी (ता. २६) आणि शनिवारी (ता. २७) आयोजित केला आहे. राज्यातील दोन हजार कार्यक्रम अधिकारी यात सहभागी होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत. विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात हे अधिवेशन होईल.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, अधिवेशनाचे निमंत्रक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले, डॉ. संजय चाकणे, डॉ. आदित्य अभ्यंकर उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्‍घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २६) सकाळी दहा वाजता होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्थीकेन, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यसंपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे उपस्थित राहणार आहेत. त्याचदिवशी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत.
अधिवेशनादरम्यान ‘जी-२०’ विषयावर शिक्षण मंत्रालयाचे संचालक रजनीश कुमार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक डॉ. ए. पी. बेहरा, शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या उपसचिव रितू चंद्रा आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT