पुणे

हडपसर, वानवडी परिसरात तीन जुगार अड्ड्यांवर छापे

CD

पुणे, ता. ११ : शहरातील हडपसर आणि वानवडी परिसरात मटका-जुगार अड्डे राजरोसपणे सुरू आहेत, परंतु स्थानिक पोलिस ठाण्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हडपसर आणि वानवडी परिसरात गेल्या दोन दिवसांत तीन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून गुन्हे शाखेने ५१ जणांना ताब्यात घेतले आहे.

हडपसर येथील गोसावी वस्ती आणि वानवडी येथील सातवनगर परिसरात मटका आणि जुगार अड्डे सुरू आहेत. याबाबत नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. दरम्यान, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला या जुगार अड्ड्यांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने सोमवारी (ता. १०) या जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत २८ हजारांची रोकड आणि मोबाइलसह सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी हडपसर आणि वानवडी पोलिस ठाण्यात २७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने मंगळवारी पुन्हा मांजरी परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत २४ जणांना ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, पोलिस अंमलदार बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, इरफान पठाण, हणमंत कांबळे, इम्रान नदाफ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

छाप्यानंतरही पुन्हा जुगार सुरूच
हडपसर परिसरात गुन्हे शाखेने सोमवारी मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून काही जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी मंगळवारी हडपसर भागातच जुगार अड्डा सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT