पुणे

मेंदूत रक्तस्राव झालेल्या रुग्णाला जीवदान

CD

पुणे, ता. ३ : रस्त्यावर झालेल्या अपघातात ३० वर्षांचा तरुण जखमी झाला. त्यात त्याच्या डोक्याला जबरी मार लागला तसेच डाव्या खांद्याचे हाड मोडले. या अपघातामुळे तरुणाच्या मेंदूमध्येही रक्तस्राव (ब्रेन हॅमरेज) झाला. इतकेच नाही, तर यकृतालाही सहा सेंटिमीटरची खोल जखम झाल्याने अंतर्गत रक्तवाहिन्या तुटल्या होत्या. बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणलेल्या या रुग्णाचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले असल्याची माहिती मणिपाल रुग्णालयातर्फे देण्यात आली.

रुग्णालयाचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विनायक घनाटे याबाबत म्हणाले, ‘‘रुग्णाचा मोडलेला पाय केवळ एका रक्तवाहिनीने जोडलेला होता. परिणामी, त्याची स्थिती अधिकच गंभीर झाली होती. ही गंभीर स्थिती पाहता वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करून रुग्णाचा जीव वाचविला. त्याचा पाय तात्पुरत्या स्वरूपात जोडून त्याची प्रकृती स्थिर करण्यात आली. त्याच बरोबर रुग्णाला ७२ तासांसाठी अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले.’’

मेंदू आणि यकृतातील रक्तस्राव थांबल्यानंतर रुग्णावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया तुटलेल्या हाडांवर स्क्रू आणि प्लेट्सच्या माध्यमातून केली गेली. यासह प्लास्टिक सर्जरी पथकाच्या मदतीने रुग्णाच्या नसा जोडण्यात आल्याचेही घनाटे यांनी सांगितले. घनाटे म्हणाले, ‘‘रुग्णावर तीन टप्प्यात शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रुग्णाने ही उत्तम प्रतिसाद दिला आणि वेळेत उपचार मिळाल्याने त्याचे प्राण तर वाचलेच, त्याचबरोबर आता रुग्ण पायावर उभा राहू लागला आहे.’’

शस्त्रक्रियेदरम्यान आव्हान
प्लास्टिक सर्जन डॉ. संदीप नाफडे म्हणाले, ‘‘रुग्णाचा पाय जोडण्याबरोबरच त्याची हालचाल आणि संवेदना पूर्ववत करणे, पहिल्या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाची प्रकृती स्थिर करून त्याचा तुटलेला पाय सांभाळणे ही आव्हाने होती. यात तुटलेली हाडे तात्पुरत्या स्वरूपात जोडून रुग्णाच्या पायाला रक्तपुरवठा सुरळीत होईल, याची खात्री करण्याची गरज होती. नंतरच्या शस्त्रक्रियांमध्ये प्रत्येक नस आणि रक्तवाहिनी पायाला जोडण्यावर भर दिला आणि त्यानंतर फ्लॅप सर्जरीच्या माध्यमातून मोडलेली हाडे झाकली.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT