पुणे

अल्प भांडवलात मोदक व्यवसाय

CD

पुणे, ता. १८ : गणेशोत्सवात मोदकांची मागणी वाढलेली असते. घरच्याघरी मोदक तयार करणारा व्यवसाय हा अल्प भांडवलात व कमी वेळेत योग्य नफा मिळवणारा आहे. पहिल्या बॅचच्या यशानंतर मोदक प्रात्यक्षिकांसहित तयार करून दाखवण्यापासून ते त्याचा यशस्वी व्यवसाय कसा उभा करावा, याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा रविवारी (ता. २०) आयोजिली आहे. यामध्ये खवा, आंबा, केशर, गुलकंद, पान, शुगर फ्री, चॉकलेट, खारे, काजू, फ्रूट, तळणीचे व उकडीचे असे बाजारात मागणी असणारे विशेष मोदक प्रकार व तांदळाचे उकड काढण्याची पीठ बनवण्याची पद्धत शिकवली जाणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क दोन हजार रुपये.


तणावमुक्ती कार्यशाळा
स्वत:भोवतालची नकारात्मक शक्ती दूर करण्यास शिकवणारी आणि कोणतीही चिंता न करता स्वस्थ आयुष्य कसे जगायचे, याबद्दल मार्गदर्शन करणारी कार्यशाळा रविवारी (ता. २०) होत आहे. ध्येय प्राप्त करून नकारात्मकता व नैराश्यावर मात कशी करता येईल, शारीरिक व मानसिक स्थिरता, तणावमुक्त, समाधानी व आनंदी जीवन कसे जगायचे आदी बाबींवर डॉ. दत्ता कोहिनकर यांचे मार्गदर्शन होईल. प्रतिव्यक्ती शुल्क ६०० रुपये.

प्रॉडक्ट फोटोग्राफी
फोटोग्राफीच्या विविध प्रकारामध्ये प्रॉडक्ट फोटोग्राफी हा एक विशेष प्रकार आहे, ज्याला व्यावसायिक व उद्योजकांकडून मागणी आहे. साध्या कॅमेऱ्यातूनही प्रॉडक्ट्सचे वेगळे फोटो अधिक उठावदार पद्धतीने ग्राहकांपर्यंत या माध्यमातून पोचते. याबाबत मार्गदर्शन करणारे चार दिवसांचे प्रशिक्षण २३, २४ व ३०, ३१ ऑगस्ट रोजी आयोजिले आहे. यामध्ये प्रॉडक्ट फोटोग्राफीचे १७ हून अधिक साधने व तंत्र, पाचहून अधिक कौशल्ये याबाबत प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यास प्रमाणपत्र मिळेल. दोन दिवसांचे क्लासरूम प्रशिक्षण व दोन दिवसांचे प्रात्यक्षिक व एडिटिंग असे प्रशिक्षणाचे स्वरूप आहे. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी, व्यवसायाला प्रोफेशनल लुक देण्यासाठी, ब्रँड अधिक ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी, स्पर्धेत टिकण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणारे आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ७००० रुपये. २१ ऑगस्टपर्यंत नावनोंदणी केल्यास ५०० रुपये सवलत मिळेल.
संपर्क : ९१४६०३८०३१, ८९५६३४४४७२
ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT