पुणे

इंटरसिटी, डेक्कन, प्रगती उद्या रद्द

CD

पुणे, ता. १८ ः पुणे विभागातील खडकी-चिंचवड रेल्वे स्थानकादरम्यान ऑटोमॅटिक सिग्नलिंग यंत्रणेचे काम सुरु आहे. रविवारी (ता. २०) तांत्रिक कामे केली जाणार असल्याने पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. यात इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेससह मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे.
पुणे-लोणावळा दरम्यान ऑटोमॅटिक सिग्नलिंग यंत्रणेचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. यातील एक महत्त्वाचा टप्पा खडकी ते चिंचवड स्थानक दरम्यान पूर्ण केला जाणार आहे. त्यासाठी नऊ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी ७.१५ ते दुपारी ४.१५ पर्यंत हा ब्लॉक आहे. त्या दरम्यान धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात एक्स्प्रेससह लोकलचा देखील समावेश आहे.

या लोकल रद्द
- पुणे-तळेगाव : सकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी
- पुणे-तळेगाव : सकाळी ८ वाजून ५३ मिनिटांनी
- पुणे-लोणावळा : सकाळी ६ वाजून ३० मिनिटांची, सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी, सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी, दुपारी तीन वाजता, दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी.
- शिवाजीनगर-तळेगाव : दुपारी ३ वाजून ४७ मिनिटे,सायंकाळी ५ वाजून २० मिनिटे.
- शिवाजीनगर-लोणावळा ः सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी.
- लोणावळा-शिवाजीनगर : सकाळी ६ वाजून ३० मिनिटे, सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी, दुपारी ३ वाजून ३० मिनिटे.
- तळेगावहून सुटणारी सकाळी ७ वाजून ४८ मिनिटे, सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी, दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी, लोणावळाहून सकाळी ७ वाजून २५ मिनिटे, सकाळी ८ वाजून २० मिनिटे, दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

हे लक्षात ठेवा
- पुणे-जयपूर एक्स्प्रेस ही गाडी पुण्याहून संध्याकाळी पावणे सहा वाजता सुटेल.
- दौंड-इंदूर एक्स्प्रेस दौंडहून सायंकाळी सहा वाजता सुटेल.
- मुंबई-चेन्नई, लोकमान्य तिलक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट, मुंबई-भुवनेश्वर, मुंबई-हैदराबाद या गाड्यांना पुणे विभागातून धावताना आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT