pmc pune sakal
पुणे

Pune News : पुणे महापालिकेवर ताशेरे; रस्त्यांवरील खड्डे, शपथपत्र दाखल करण्याचा आदेश

पुणे महापालिकेने शहरात गेल्या वर्षी ११४ ठिकाणी खड्डे असल्याचे सांगितले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेने शहरात गेल्या वर्षी ११४ ठिकाणी खड्डे असल्याचे सांगितले. यावर्षी फक्त ११३ ठिकाणी खड्डे असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. हा प्रकार गंभीर आहे. महापालिकेकडून गेल्या वर्षीचेही खड्डे अद्याप दुरुस्त झालेले नाहीत.

त्यामुळे रस्त्यांची योग्य प्रकारे देखभाल करण्याचे काम महापालिकेने केलेले नाही हे उघड झाले आहे, अशा शब्दात उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे.
खड्ड्यांबाबत येत्या तीन आठवड्यांत पुन्हा शपथपत्र दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने महापालिकेला तसेच नगररचना विभागालाही दिला आहे.

महापालिकेकडून शहरातील रस्त्यांची योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती करावी, याबाबत उच्च न्यायालयाने महापालिकेला आदेश देण्याबाबत विमाननगर भागातील सामाजिक कार्यकर्त्या कनिज सुखरानी यांनी मे महिन्यात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायाधीश आरिफ एस. डॉक्‍टर यांच्या खंडपीठाने महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत. या याचिकेची पुढील सुनावणी २९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

नेमके काय झाले?
- पुणे महापालिका आयुक्तांनी रस्त्यांच्या अभ्यासासाठी २०१३ व २०१६ मध्ये दोन समित्या तयार केल्या होत्या. - त्यामध्ये रस्त्यांच्या कामाचा दर्जा, डिझाईन व बांधकाम तपासणी करण्यात येणार होती.
- २०१८ मधील ठरावानुसार सरकारने रस्त्यांच्या योग्य देखभाल दुरुस्तीबाबत अनेक निर्देश दिले आहेत.
- संबंधित ठराव व रस्त्याबाबतच २०१८ मध्ये न्यायालयाने पूर्वीच्या याचिकेवरून दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याची महापालिकेची जबाबदारी असतानाही त्यांनी त्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत.
- माहिती अधिकारात उघड झालेल्या माहितीनुसार, महापालिकेने २०२२ मध्ये ११४ खड्डेप्रवण क्षेत्र असल्याचे नमूद केले आहे, २०२३ मध्ये ११३ खड्डेप्रवण क्षेत्र असल्याचे पुन्हा सांगितले आहे.
- म्हणजे, पूर्वी दिसून आलेले खड्डे कमी झालेलेच नाहीत.
- यावरूनच रस्त्यांची निगा राखण्याचे शाश्‍वत काम महापालिकेने केले नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

खड्डे दुरुस्तीवर पुणे महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. परंतु शहरातील परिस्थितीत फरक पडलेला नाही. न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर आता तरी महापालिकेचा कारभार सुधारेल, अशी अपेक्षा आहे.
- कनिज सुखरानी, सामाजिक कार्यकर्त्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT