पुणे

गणरायाची शाडूची मूर्ती फक्त ७०० रूपयांमध्ये

CD

पुणे, ता. २१ ः ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात आपल्याला केवळ ७०० रुपयांमध्ये बाप्पाची सुरेख अशी आठ इंच उंचीची शाडू मातीत बनविलेली मूर्ती मिळणार आहे.
स्ट्रोक्स फाउंडेशनच्या मार्गदर्शकांच्या मदतीने ही मूर्ती आपण कार्यशाळेत रंगवू शकता. इथे आपल्याला मूर्ती रंगविण्यासाठी नैसर्गिक रंग मोफत पुरवले जाणार आहेत, जेणेकरून गणरायाची मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक होईल. यानिमित्ताने आपण व आपल्या मुलांनी स्वत: रंगवलेली बाप्पाची मूर्ती आपल्या घरी विराजमान करता येईल. त्यामुळे ही अनोखी संधी न सोडता, या कार्यशाळेचा लाभ घेऊन इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यशाळेसाठी आजोळ डे केयर ॲंड प्री-स्कूल व इव्हॉल्व हाय ग्लोबल स्कूल हे सहायक प्रायोजक म्हणून लाभले आहेत.


कार्यशाळेविषयी...
- कधी : ९ सप्टेंबर
- पहिली बॅच : सकाळी १० ते १, सकाळ मुख्य कार्यालय, बुधवार पेठ
- दुसरी बॅच : सायंकाळी ४ ते ७, शैलेश हॉल, अलंकार पोलिस चौकीजवळ, कर्वेनगर
- सोबत आणायचे साहित्य : पेंटींग ब्रश (नंबर ०, २, ४, ६ तसेच राउंड व फ्लॅट ब्रश नंबर सहा) कलरींग पॅलेट, नॅपकिन, छोटा बाउल
- शुल्क ७००
- माहितीसाठी संपर्क : ९३५६८९५१८६, ९५५२५३३७१३, ८८०५००९३९५ व ९४२२६५२९५९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT