Pune News sakal
पुणे

Pune News : पुण्यात तीन परवाना निरीक्षक निलंबित

होर्डिंगकडे दुर्लक्ष भोवले : नियमांचे उल्लंघन केल्याने महापालिकेकडून कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नियमांचे उल्लंघन करून टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे होर्डिंग उभारणीचे काम सुरू असताना त्याकडे कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने तीन परवाना निरीक्षकांचे निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे.

महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागातर्फे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून परवानग्या दिल्या जातात. पण अनेकदा कागदावर सगळे योग्य असले तरी प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन केलेले असते. असाच प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागात संभाजी पोलिस चौकीच्या मागे उभारलेल्या होर्डिंगमुळे उघडकीस आला आहे.

या ठिकाणी तीन होर्डिंगला परवानगी दिल्यानंतर त्यामध्ये नियमानुसार एक मीटरचे अंतर ठेवणे बंधनकारक होते. पण संबंधित व्यावसायिकाने सलग १०० फुटांचे होर्डिंग उभारले आहेत. हे काम सुरू असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते.

अतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार, उपायुक्त माधव जाधव, अविनाश सकपाळ यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे परवाना निरीक्षकांना यावर कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले होते. पण अद्याप खुलासा सादर केला नाही.

होर्डिंग व्यावसायिकाला होर्डिंगवर जाहिरात लावण्यास मनाई केलेली असतानाही तेथे जाहिरात लावण्यात आली आहे. त्याकडेही परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या तिघांना निलंबित करण्याचा आदेश उपायुक्त माधव जगताप यांनी काढला आहे.

होर्डिंगची पाहणी केल्यानंतर त्यामध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. त्यामुळे परवाना निरीक्षकांकडून खुलासा मागविला होता, तसेच होर्डिंगवर जाहिरात करण्यास बंदी घातली होती. तरीही संबंधित व्यावसायिकाने जाहिराती सुरू केल्या आहेत. परवाना निरीक्षकांनी कामात हलगर्जीपणा केल्याने तिघांना निलंबित केले आहे. या तिघांची विभागीय चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. तसेच होर्डिंगवरही कारवाई केली जाणार आहे.
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

हे आहेत प्रमुख आक्षेप
- तीन होर्डिंगमध्ये एक फुटाचे अंतर न ठेवता १०० फूट लांबीचे एकच होर्डिंग उभारले
- संभाजी पुलाच्या भरावाला छेद देऊन होर्डिंग उभारले आहे.
- होर्डिंग उभारताना वृक्षतोड करण्यात आली, पण त्याच्या परवानगीबाबत स्पष्टता नाही
- ही जागा नदीपात्रात असूनही पूर रेषेबाबत पाटबंधारे विभागाचा अभिप्राय नाही
- जागेचा मोजणी नकाशा नाही
- पोलिस विभागाचा अभिप्राय नाही
- ही जमीन महापालिकेच्या मालकीची आहे की नाही याची खात्री नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT