देशात प्रथमच ''पुश-पूल'' रेल्वेची निर्मिती
चेन्नईतील कारखान्यातून ऑक्टोबरमध्ये प्रवाशांच्या भेटीला
पुणे, ता. १८ ः देशात प्रथमच ''पुश-पूल'' पद्धतीची स्वतंत्र रेल्वे तयार केली जात आहे. चेन्नईतील ''आयसीएफ'' कारखान्यात या रेल्वेगाडीची निर्मिती सुरु आहे. पुढील महिन्यात ही रेल्वेगाडी प्रवाशांच्या भेटीला येण्याची अपेक्षा आहे.
या रेल्वेगाडीच्या पुढे आणि मागे अशी दोन इंजिन असतील. दोन इंजिनांच्या शक्तीने ती धावेल. यासाठी विशेष इंजिनचीही निर्मिती केली जात आहे. कर्जत-लोणावळा सारख्या घाट विभागात चढाई करण्यासाठी रेल्वेगाडीला बँकर्स लावले जातात. तशा पद्धतीची ही रेल्वे असेल.
रेल्वे स्थानकावर इंजिनचे शंटिंग करण्यासाठी किमान तीस मिनिटांचा अवधी लागतो. त्याचा परिणाम प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर होतो. ''पुश-पूल'' पद्धतीची रेल्वे सुरु झाल्यास इंजिनचे शंटिंग करण्याची आवश्यकता भासणार नाही. शिवाय घाटासाठी बँकर्स लावण्याचीही गरज उरणार नाही.
यापूर्वी पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांना असा प्रयोग करण्यात आला होता. मात्र त्यास अपेक्षित यश मिळाले नव्हते.
---
कशी आहे ''पुश-पूल'' रेल्वे
- २२ डबे
- शयनयान दर्जाचे डबे
- विनावातानुकूलित डबे
- ताशी १३० किमी वेगाने धावण्याची क्षमता
-वंदे भारत एक्स्प्रेस प्रमाणे कपलिंग
---
''पुश-पूल'' पद्धतीच्या रेल्वेसाठी आवश्यक असणाऱ्या डब्यांची निर्मिती अंतिम टप्प्यात पोचली आहे. पहिल्या टप्प्यात दोन रेल्वेगाड्या तयार केल्या जातील.
- जी व्यंकटेशन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, आयसीएफ, चेन्नई
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.