पुणे

मानवी हक्कांवर मूट कोर्ट स्पर्धा

CD

पुणे, ता. २८ : भारती विद्यापीठमधील ‘न्यू लॉ कॉलेज’मध्ये मानवी हक्कांबाबत ‘न्यायमुर्ती पी. एन. भगवती इंटरनॅशनल मूट कोर्ट स्पर्धा’ आयोजित केली होती. स्पर्धेचे हे अकरावे वर्ष आहे. २५ आणि २६ मार्च रोजी ही स्पर्धा पार पडली.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम उपस्थित होत. अंतिम फेरीचे परीक्षक केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मेरी जोसेफ, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजित कुमार, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. सुधीर कुमार जैन, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. नीला केदार गोखले यांनी केले. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार होते. सर्वोच्च न्यायालय वेळोवेळी गरिबांतील गरिबांच्या हक्कांसाठी उभे राहिले आहे. देशातील नागरिकांच्या आकांक्षांवर नेहमीच यश मिळवले आहे, असे न्यायमुर्ती रविकुमार यांनी सांगितले.
विद्यापीठाचे सचिव डॉ. विश्वजीत कदम यांनी भारती विद्यापीठाच्या कार्यावर प्रकाश टाकला. कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कालॅजेच्या प्रभारी प्राचार्या डॉ. उज्ज्वला बेंडाळे यांनी स्वागत केले. यंदाच्या स्पर्धेत सात आंतरराष्ट्रीय आणि १३ राष्ट्रीय संघ सहभागी झाले होते. राजीव गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ पाटिया, एनएलआययू, भोपाळ आणि केनियातील एआयओ युनिव्हर्सिटीच्या संघाने अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT