पुणे

चार धरणांचा पाणीसाठा केवळ २६ टक्के

CD

पुणे, ता. २६ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. टेमघर आणि पानशेत या धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे चारही धरणांत मिळून सध्या केवळ २६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे ही चारही धरणे १०० टक्के भरली होती. यंदा मात्र सरासरीपेक्षा कमी आणि विलंबाने पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे आतापासूनच पाणी बचतचे आवाहन राज्य सरकार व जलसंपदा विभागाकडून वारंवार करण्यात येत आहे. तर महापालिकेने देखील आठवड्यातून एकदा पाणीकपात सुरू केली आहे.
सध्या खडकवासला धरणातून १०५४ क्युसेकने नवीन मुठा उजवा कालव्यातून शेतीसाठी आवर्तन देण्यात येत आहे. या आवर्तनात साडेचार ते पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचे नियोजन आहे. उर्वरित पाणी पुणे शहरासाठी राखून ठेवले आहे. धरणांमधील उपलब्ध पाणी विचारात घेऊन जलसंपदा विभागाकडून १५ ऑगस्टपर्यंतचे पाण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, उन्हाचा कडाका वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीचोरी, गळती आणि सिंचन आवर्तन यामुळे मार्च महिन्यातच शहराला अडीच महिने पुरेल एवढा पाणीसाठा संपला आहे. एप्रिल महिन्यातही पाणी वापराची हीच स्थिती कायम राहिली आहे. गेल्या वर्षी २५ मे रोजी चारही धरणांत मिळून एकूण ६.९८ टीएमसी म्हणजेच २३.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे जिल्ह्यातील अन्य १३ धरणांनी गाठला तळ आहे. त्यामध्ये पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, वडीवळे, कासारसाई, गुंजवणी, नाझरे आणि उजनी यांचा समावेश आहे. उजनी धरणात उणे ११.७२ टीएमसी पाणीसाठा असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

धरणांमधील पाणीसाठा
धरण पाणीसाठा - टीएमसी - टक्क्यांत
टेमघर - ०.१९ - ५.०८
वरसगाव - ४.६१ - ३५.९२
पानशेत - १.८३ - १७.१९
खडकवासला - १.०५ - ५३.१२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT