money sakal
पुणे

Debt Collection Agent : कर्जवसुलीसाठी एजंटला दिली जाते टक्केवारी!

व्यावसायिक कामासाठी मी माझ्या एका मित्राला १२ लाख रुपये हातउसणे दिले होते. त्याने वेळेत पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्याने मी वसुली एजंटला पैसे परत मिळवून देण्याचे काम दिले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - व्यावसायिक कामासाठी मी माझ्या एका मित्राला १२ लाख रुपये हातउसणे दिले होते. त्याने वेळेत पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्याने मी वसुली एजंटला पैसे परत मिळवून देण्याचे काम दिले. त्यांनी काही ठराविक टक्केवारी स्वतःला ठेवून माझे पैसे मला परत मिळवून दिले, अशी माहिती येथील एका व्यावसायिकाने दिली.

या व्यावसायिकाने त्यांच्या एका मित्राला हातउसणे पैसे दिले होते. मात्र, पैसे वेळेत परत न आल्याने त्यांनी हा मार्ग अवलंबला. पैसे परत घेताना कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होणार नाही. तसेच कर्जदाराला विनाकारण त्रास दिला जाणार नाही, याची काळजी घेतल्याचेही त्यांनी सांगितले. हातउसणे दिलेले पैसे काही केल्या परत मिळत नाही, पैसे घेतलेल्या व्यक्ती कर्जबाजारी झाला आहे, न्यायालयीन लढा दिल्यानंतरही पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे, असे प्रसंग निर्माण झाल्यानंतर पैशांची वसुली करण्यासाठी आता खासगी संस्थांचा वापर केला जात आहे. त्या संस्थेला (वसुली एजंट) रकमेतील ठराविक टक्केवारी देवून हे काम केले जात आहे.

नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (एनबीएफसी), मालमत्ता पुनर्रचना कंपन्या (एआरसी), परवानाधारक सावकार, खासगी सावकार किंवा ओळखीतून एकमेकांना दिलेल्या पैशांची वसुली करण्यासाठी ही पद्धत वापरली जात आहे. पोलिस आणि न्यायालयाची प्रक्रिया करायला लागू नये. तसेच पैसे अगदीच बुडण्याच्या मार्गावर असतील तर त्यातील थोडीफार रक्कम मिळेल, या आशेवर अशा संस्थांचा वापर केला जात आहे. त्याबदल्यात त्यांना आठ ते अगदी १५ टक्क्यांपर्यंतचे कमिशन दिले जात आहे.

अशी केली जातेय वसुली

दिलेले कर्ज कायदेशीर असो व बेकायदेशीर...कर्जदाराला वकिलामार्फत नोटीस पाठवली जाते. रक्कम परत केली नाही तर कायदेशीर कारवार्इला सामोरे जावे लागेल, अटक होवू शकते, शिक्षा होर्इल अशा प्रकारचा उल्लेख त्यात असतो. तसेच कर्जदाराच्या घरी काही व्यक्ती पाठवल्या जातात ज्या दिवसभर थांबून राहतात. या प्रक्रियेत सरकारी यंत्रणेतील व्यक्तीचा देखील वापर केला जात असल्याची उदाहरणे आहेत. कर्जदारांवर साम, दाम, दंड, भेद वापरून दबाव आणला जातो व त्याआधारे कर्जाची वसुली केली जाते.

कर्ज घेतलेले पैसे भरणे ही कर्जदाराची जबाबदारी आहे. मात्र, तसे न केल्यास कर्ज वसूल करण्यासाठी कायद्यात काही प्रक्रिया दिलेली आहे. कर्जदार जर पैसे देण्यास तयार नसेल व त्याबाबतचे कायदेशीर कागदपत्रे कर्ज देणाऱ्या व्यक्तीकडे असेल तर ते प्रकरण न्यायालयात जाते. मात्र, काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच पैसे वसूल केले जातात, याची अनेकांना माहिती नाही. व्यवस्थेचा चुकीचा वापर करून पैसे वसूल केले जातात. त्यामुळे कर्जदारांनी याबाबत अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे.

- ॲड. भूषण कोकरे, दिवाणी व फौजदारी वकील

वसुलीबाबत काय आहे नियम?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) वित्तपुरवठादार, बँका, वित्तीय सेवापुरवठादार यांच्या वसुली एजंट्ससाठी काही सूचना जारी केल्या आहेत.

१) कर्जदारांना सकाळी आठ वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी सातनंतर वसुलीसाठी फोन करायचा नाही

२) कर्जाच्या वसुलीसाठी दिलेल्या सूचनांचे योग्य प्रकारे पालन करावे

३) या वित्तीय संस्थांनी थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदारांना नाहक त्रास द्यायचा नाही

४) वसुलीसाठी नाहक त्रास दिला जात असेल तर एजंटांना वित्तीय संस्थांनी प्रतिबंध घालावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT