पुणे

शहरातील विविध चर्चमध्ये फादर्स डे उत्साहात साजरा

CD

पुणे, ता. १८ ः वडिलांची कर्तव्ये, त्यांच्या जबाबदाऱ्या व मुलांवर होणारे संस्कार याबाबतचा संदेश, त्याचबरोबर नागरिकांना केक, गुलाबपुष्प देऊन रविवारी शहरातील बहुतांश चर्चमध्ये फादर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला.

शहरातील बहुतांश चर्चमध्ये फादर्स डेनिमित्त रविवारी सकाळी व सायंकाळी विशेष कार्यक्रम घेण्यात आले. धर्मगुरुंनी ‘वडिलांची कर्तव्ये, त्यांच्या जबाबदाऱ्या व मुलांवर होणारे संस्कार’ या विषयावर उपस्थितांना संदेश दिला. ख्राईस्ट चर्च (रास्ता पेठ), चर्च ऑफ द होलीनेम (गुरुवार पेठ), सेंट मॅथ्युज चर्च (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता), देशपांडे चर्च (कसबा पेठ), इम्यॅन्युअल चर्च (महात्मा फुले पेठ), सेंट मेरी चर्च (खडकी), मेथडीस्ट मराठी चर्च, सेंट मेरी चर्च (पुलगेट), सेंट पॉल चर्च (सांगवी), सेंट क्रिस्पीन मराठी चर्च (कर्वे रस्ता), सत्याची जिवंत मंडळी चर्च (येरवडा) या चर्चमध्ये फादर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला. बिशप ॲन्ड्रु राठोड, धर्मगुरू संजय ठाकुर, अभिषेक विवेक रॉजर्स, चंद्रशेखर जाधव, सुधीर गायकवाड, फ्रान्सीस कसबे आदी धर्मगुरुंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या चर्चसमवेत शहरातील अन्य चर्चमध्ये फादर्स डेनिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना केक, गुलाबपुष्प व विविध प्रकारच्या भेटवस्तू देण्यात आल्या, अशी माहिती चर्च ऑफ होलीनेमचे कार्यकर्ते सुधीर चांदेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

Xiaomi 18 Pro Series होणार लाँच! 8500mAh बॅटरी, ड्युअल 200MP Leica कॅमेरा; पाहा नव्या फ्लॅगशिपचे भन्नाट फीचर्स!

Mumbai Water Metro: मुंबई वॉटर मेट्रोसाठी समुद्रतळाचा मोठा अडथळा; खडकाळ भागात ‘रॉक ड्रेजिंग’, २५० किमी जलमार्गांचा विकास

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT