Pune Airport sakal
पुणे

Pune Airport : ‘पार्किंग बे’ बंद झाल्याचा विमान प्रवाशांना फटका; रोज किमान आठ विमानांना उशीर

पुणे विमानतळावरील ‘पॅकिंग बे क्रमांक १’मध्ये गेली २६ दिवस अपघातग्रस्त विमान दुरुस्तीअभावी तसेच ठेवले गेले आहे. याशिवाय विमानतळावर मुळातच बऱ्याचशा पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे विमानतळाची क्षमता घटली आहे. परिणामी रोज किमान सात ते आठ विमानांना उशीर होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे विमानतळावरील ‘पॅकिंग बे क्रमांक १’मध्ये गेली २६ दिवस अपघातग्रस्त विमान दुरुस्तीअभावी तसेच ठेवले गेले आहे. याशिवाय विमानतळावर मुळातच बऱ्याचशा पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे विमानतळाची क्षमता घटली आहे. परिणामी रोज किमान सात ते आठ विमानांना उशीर होत आहे.

पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला १६ मे या दिवशी पुणे विमानतळावर अपघात झाला. दुरुस्तीअभावी हे विमान अजूनही ‘पार्किंग बे’मध्येच आहे. मुळात ‘पार्किंग बे’ व विमानतळावर जागेची कमतरता आहे. यात एक ‘पार्किंग बे’ ब्लॉक झाल्याने त्याचा परिणाम अन्य विमानांच्या वेळापत्रकावर होत आहे. विमानतळाची परिचालन क्षमता घटली आहे. एक ‘पार्किंग बे’बंद राहिल्यास विमानतळाची क्षमता किमान १० टक्क्यांनी घटते. या सर्वांचा परिणाम प्रवासी सेवेवर झाला आहे.

कोणत्याही विमानतळावरील विमानांची वाहतूक आणि वेळापत्रक ठरविताना प्रामुख्याने ‘पार्किंग बे’ची जागा (पार्किंगची जागा) किती आहे याचा विचार केला जातो. जितके जास्त ‘पार्किंग बे’ तितक्या प्रमाणात विमानांची वाहतूक सुरळीतपणे होते. पुणे विमानतळावर मुळातच अनेक समस्या आहेत. पायभूत सुविधा व जागेची कमतरता असल्याने प्रवाशांची मागणी असूनही विमानांच्या संख्येत वाढ होत नाही. त्यातच ‘पार्किंग बे’ जवळपास महिनाभर बंद असल्याने विमानांना अन्य पार्किंग बे मध्ये थांबावे लागते आहे. यासाठी अनेकदा विमानांना पर्यायाने प्रवाशांना वाट पाहणे भाग पडते. परिणामी विमानांना उशीर होतो.

पार्किंग बे १० अन् विमाने ९५
पुणे विमानतळावर एकूण १० ‘पार्किंग बे’ आहेत. दिवसाला सरासरी १८५ ते १९० विमानांची वाहतूक होते. रोज किमान ९२ ते ९५ विमानांचे लँडिंग होते. एका ‘पार्किंग बे’वर दिवसाला सरासरी ८ ते ९ विमान थांबविली जातात. दहापैकी एक जरी ‘पार्किंग बे’ बंद राहिल्यास नऊ विमाने दुसऱ्या ‘पार्किंग बे’वर थांबविली जातात. परिणामी अन्य ‘पार्किंग बे’वर विमानांचा ताण येतो. यामुळे विमानांना विलंब वाढतो.

‘पार्किंग बे’ का बंद झाला ?
एअर इंडियाच्या विमानाचे अपघातात मोठे नुकसान झाले. ही घटना गंभीर असल्याने ‘डीजीसीए’ने याची दखल घेतली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी ‘डीजीसीए’चे पथक पुण्यात दाखल होऊन विमानाची तपासणी केली जाणार होती. मात्र अद्याप ही तपासणी झालेली नाही. त्यामुळे मागील विमान ‘पार्किंग बे’वरच ठेवण्यात आले आहे. परिणामी तो अन्य विमानांसाठी बंद झाला आहे.

‘डीजीसीए’चे पथक अपघाताचे कारण शोधण्यासाठी विमानाची तपासणी करणार आहे. त्यानंतर अहवाल प्राप्त होईल. अहवाल मिळाल्यानंतरच संबंधित विमान कंपनी विमानाची दुरुस्ती करेल. त्यानंतरच ‘पार्किंग बे’ अन्य विमानांसाठी खुला होईल.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

पुणे विमानतळाची क्षमता मुळातच कमी आहे. त्यामुळे प्रवाशांना रोजच विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात एक ‘पार्किंग बे’ बंद असल्याने विमानतळाची विमाने सामावून घेण्याची आणि पर्यायाने परिचालनाची क्षमता कमी झाली आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. काही विमानांना उशीर होतो आहे. - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT