पुणे

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक’ पुरस्कारांची घोषणा २७ नोव्हेंबरला

CD

पुणे, ता. १७ ः ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ पुरस्कार सोहळ्याची नामांकने २७ नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता कर्वेनगर येथील डी. पी. रस्ता, केशव बाग येथे पार पडणार आहे.
‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण २३ विभागांमध्ये मराठी चित्रपटांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नाट्य विभागात १६ पुरस्कार दिले जाणार आहेत. १ जून २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत प्रदर्शित किंवा सेन्सॉर झालेल्या मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांना तसेच चित्रपटांना पुरस्कार सोहळ्यात प्रवेश देण्यात आला आहे.
यावेळी कर्तृत्वाच्या बळावर समाजाला नवी दिशा देण्याचे काम करणाऱ्या नवदुर्गांना ‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये आरती बनसोडे, सायली पिलाणे, सिस्टर लुसी कुरियन, पूजा धुरी, ताराबाई पवार, तेजस्वी सेवेकरी, ज्योती सचदा, आदिती स्वामी, अहिल्याबाई बर्डे यांची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: "बिचारे देव मतदान करू शकत नाही, म्हणून..."; उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना फटकारले, काय आहे प्रकरण?

Ichalkaranji Firing News : इचलकरंजीत पोलिसादेखत गुंडावर गोळीबार, भरवस्तीत प्रकाराने एकच धावाधाव; जखमी सांगलीचा; हल्लेखोर पसार

Latest Marathi News Live Update : एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जाणार; ‘हे’ आहे कारण, महावितरणकडून ग्राहकांना इशारा, वाचा...

अग्रलेख : युद्धाच्या पडछायेत...

SCROLL FOR NEXT